Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तडजोडीस नकार दिल्यानंतर मला ईडीकडून अटक

राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते अनिल देशमुखांचा भाजपवर गंभीर आरोप

नागपूर/प्रतिनिधी ः 100 रुपयांच्या खंडणीप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने अटक केल्यानंतर सुटका झालेले राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आणि माजी

खोटी प्रतिज्ञापत्रे घेवून येणारा तो एनडीएचा पदाधिकारी
अनिल देशमुखांना जामीन मंजूर
माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना जामीन नाहीच

नागपूर/प्रतिनिधी ः 100 रुपयांच्या खंडणीप्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने अटक केल्यानंतर सुटका झालेले राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी भाजप गंभीर टीका करतांना म्हटले की, भाजपने तडजोड करण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला होता, मात्र मी तडजोड करण्यास नकार दिल्यानंतर दुसर्‍याच दिवशी माझ्या घरी छापे टाकण्यात आले, आणि त्यानंतर मला अटक करण्यात आल्याचा गंभीर आरोप देशमुख यांनी भाजपवर केला.
माध्यमांशी बोलतांना देशमुख म्हणाले की, समझोता करण्यास नकार दिला, त्यामुळे परमवीर सिंग यांना माझ्यावर खोटे आरोप करायला लावले आणि माझ्यावर कारवाई करायला लावली, हे शंभर टक्के खरे आहे. ज्या पद्धतीने माझ्यावर दबाव होता, मी सरळ सांगितले की मी कोणत्याही पद्धतीने समझोता करणार नाही आणि त्याच्या दुसर्‍याच दिवशी माझ्यावर रेड पडली. आणि माझ्यावर कारवाई करण्यात आली, ही वस्तुस्थिती आहे, अशी धक्कादायक माहिती देशमुखांनी दिली.  देशमुख यांच्यावर गृहमंत्री असताना पदाचा गैरवापर करून बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. 100 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणामध्ये 2022च्या जून महिन्यात सीबीआयने अनिल देशमुख यांच्याबरोबरच त्यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे, संदीप पलांडे यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि माजी पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांना 100 कोटी खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा आरोप आहे. परमबीर सिंह यांनीच हे आरोप केले आहेत. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर कोर्टाने या प्रकरणात गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीचे आदेश दिले. सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीने देखील या प्रकरणात कारवाईला सुरुवात केली. अनिल देशमुख यांच्यावर आपल्या पदाचा गैरवापर करून भ्रष्टाचार केल्याचा आणि बेनामी संपत्ती गोळा केल्याचा आरोप आहे. ईडीच्या म्हणण्यानुसार, बडतर्फ करण्यात आलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझेने बार सुरळीत चालवण्यासाठी मुंबईतील ऑर्केस्ट्रा बारमालकांकडून 4.7 कोटी रुपये उकळले आणि ही रक्कम देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे यांना दिली, जे नंतर नागपूरला गेले आणि त्यांनी एका व्यक्तीला है पैसे सोपवले. ईडीच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, त्यांच्या तपासात असे समोर आले आहे की हवाला चॅनेलद्वारे पैसे दिल्लीस्थित सुरेंद्र कुमार जैन आणि वीरेंद्र जैन यांना पाठवले गेले होते, जे बनावट कंपन्या चालवत होते. जैन बांधवांनी हे पैसे नागपूरच्या श्री साई एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली असलेल्या ट्रस्टला दान केल्याचा आरोप आहे. दरम्यान, सुरुवातीला हा गैरव्यवहाराचा आकडा 100 कोटी रुपये असल्याचा दावा करण्यात आला. मात्र, पुढे हा आकडा कमी कमी होत गेला. अनिल देशमुख यांनी सचिन वझेमार्फत मुंबईतील बार मालकांकडून 4 कोटी 70 लाख रुपये खंडणी वसूल केली. यानंतर हे पैसे बेकायदेशीर मार्गाने नागपूरच्या श्री साई शिक्षण संस्थेत पाठवले. या शिक्षण संस्थेवर अनिल देशमुख यांच्या कुटुंबातील सदस्यांचं नियंत्रण आहे, असा आरोप ईडीने अनिल देशमुखांवर केला होता. या प्रकरणी अनिल देशमुख वर्षभर तुरुंगातही होते.

COMMENTS