मी 70 कोटीचे कर्ज वसुल करून दिले ; नवे अध्यक्ष अग्रवाल यांचा दावा, कृती आराखडा राबवण्याचा मनोदय

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मी 70 कोटीचे कर्ज वसुल करून दिले ; नवे अध्यक्ष अग्रवाल यांचा दावा, कृती आराखडा राबवण्याचा मनोदय

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर अर्बन बँकेच्या थकबाकी वसुलीवर अधिक भर देणार आहे. प्रशासक काळात 70 कोटींचे थकीत कर्ज मी वसूल केले आहे. आम्ही कोणताही फ्रॉड केल

रक्षाबंधनासाठी गावी जाणे पडले महागात
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे ; राज्यमंत्री अब्दुल सत्तार
मित्राच्या वाढदिवसाला नेत पतीने पत्नीवर करवला सामूहिक बलात्कार | LOKNews24

अहमदनगर/प्रतिनिधी : नगर अर्बन बँकेच्या थकबाकी वसुलीवर अधिक भर देणार आहे. प्रशासक काळात 70 कोटींचे थकीत कर्ज मी वसूल केले आहे. आम्ही कोणताही फ्रॉड केलेला नाही म्हणूनच कर्ज वसूल करू शकलो, असा दावा नगर अर्बन बँकेचे नूतन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी बुधवारी येथे केला. बँकेचा वाढलेला एनपीए कमी करून बँकेला अडचणीतून बाहेर काढण्यास प्राधान्य देणार आहे. बँकेच्या प्रगतीसाठी कृति आराखडा तयार केला असून त्यानुसारच पुढील कारभार करणार आहे. बँकेला गतवैभव प्राप्त करून बँकेचे माजी अध्यक्ष व माजी खासदार (स्व.) दिलीप गांधी यांचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे, असेही अग्रवाल यांनी सांगितले.
नगर अर्बन बँकेच्या निवडणूक निकालानंतर व (स्व.) दिलीप गांधी प्रेरित आणि माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलने निर्विवाद विजय मिळवल्यावर बुधवारी सर्व विजयी उमेदवारांना जिल्हा उपनिबंधक व निवडणूक अधिकारी दिग्विजय आहेर यांच्यावतीने निवडून आल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्यानंतर बँकेच्या सभागृहात निवडणूक अधिकारी आहेर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या पहिल्या सभेत अध्यक्षपदी अग्रवाल व उपाध्यक्षपदी गांधी यांची निवड करण्यात आली. यावेळी सहकार पॅनलचे नेते सुवेंद्र गांधी, श्रीमती सरोज गांधी, नूतन संचालक अजय बोरा, अनिल कोठारी, महेंद्र गंधे, शैलेश मुनोत, संपतलाल बोरा, दिनेश कटारिया, कमलेश गांधी, अशोक कटारिया, राहुल जामगावकर, अतुल कासट, सचिन देसरडा, ईश्‍वर बोरा, गिरीश लाहोटी, मनेष साठे, संगीता गांधी, मनिषा कोठारी आदी उपस्थित होते. नगर जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, अ‍ॅड राहुल जामदार, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश रोकडे यांनीही नव्या पदाधिकार्‍यांचा सत्कार केला.

धी स्वच्छता करणार-अग्रवाल
यावेळी बोलताना अध्यक्ष अग्रवाल यांनी, अर्बन बँकेच्या निवडणुकीत सर्व सभासद मतदारांनी मोठा विश्‍वास व्यक्त करून सहकार पॅनलला विजयी केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. बँकेच्या कामाला सुरुवात करताना सर्वप्रथम बँकेच्या सर्व शाखांमध्ये विशेष स्वच्छता मोहीम राबवून सर्व शाखा चकाचक करून नव्या उमेदीने काम सुरु करणार आहे व सभासद हिताला प्राधान्य देत बँकेच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. नूतन उपाध्यक्ष दीप्ती गांधी म्हणाल्या, स्व.दिलीप गांधी यांच्या कृपा आशीर्वादाने मला हे पद मिळाले आहे. त्यांच्या विचाराने काम करून या पदाला पूर्ण न्याय देण्यास मी प्रयत्न करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी सर्व नूतन संचालकांनी मनोगते व्यक्त केली. संचालक अजय बोरा यांनी सूत्रसंचालन केले. साईदीप अग्रवाल यांनी आभार मानले.

इच्छुकांचे पत्ते झाले कट
बँकेच्या नव्याने झालेल्या निवडणुकीत 8 माजी संचालक निवडून आले आहेत. त्यांच्यापैकी शैलेश मुनोत व अनिल कोठारी यांची नावे अध्यक्षपदासाठी तर मनेष साठे यांचे उपाध्यक्षपदासाठी नाव चर्चेत होते. यामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षपदावर कोणाची वर्णी लागते, याकडे लक्ष लागले होते. नव्या पदाधिकार्‍यांच्या निवडीसाठी रात्री उशिरापर्यंत बैठक चालली होती. त्यानंतर बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदासाठी अग्रवाल व उपाध्यक्षपदासाठी (स्व.) खा. दिलीप गांधी यांच्या स्नुषा दीप्ती गांधी यांचे नाव निश्‍चित करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने अन्य इच्छुकांच्या समर्थकांमध्ये निराशा पसरली. मात्र, त्यानंतर पदाधिकारी निवडीच्यावेळी अध्यक्षपदासाठी अग्रवाल व उपाध्यक्षपदासाठी गांधी यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी दिग्वीजय आहेर यांनी त्यांची बिनविरोध जाहीर केल्यावर सहकार मंडळाच्या समर्थकांनी फटाके उडवून जल्लोष केला.

COMMENTS