पतीने आत्महत्या केल्याने पत्नीविरोधात गुन्हा दाखल

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पतीने आत्महत्या केल्याने पत्नीविरोधात गुन्हा दाखल

अहमदनगर/प्रतिनिधी : नवरा-बायकोच्या भांडणात राग अनावर झाल्याने नवर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा येथे रविवारी

पुणतांब्यात विरोधकांनी जल जीवन मिशनचे काम केले बंद
अतिवृष्टीची भरपाई न दिल्यास जलसमाधी घेणार
ज्ञानेश्‍वर देशमुख यांच्याकडून नवे देडगाव शाळेला पुस्तके भेट

अहमदनगर/प्रतिनिधी : नवरा-बायकोच्या भांडणात राग अनावर झाल्याने नवर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नगर तालुक्यातील पिंपळगाव कौडा येथे रविवारी (28 नोव्हेंबर) घडली. या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये पत्नीसह इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोपीचंद रोहिदास भोसले (वय 30, रा. पिंपळगाव कौडा) असे मृताचे आहे. गोपीचंद भोसले याचे श्रुती भोसले हिच्यासमवेत तीन वर्षांपूर्वी लग्न झाले होते. श्रुती हिचे माहेर भिंगार येथे आहे. लग्न झाल्यापासून नवरा-बायकोमध्ये सातत्याने भांडण होत होती. या भांडणामुळे श्रुती हिने सासरी न जाण्याचा निर्णय घेतलेला होता. गोपीचंद हा तिला भेटण्यासाठी भिंगारला येत होता. येथे गोपीचंद व श्रुतीमध्ये शनिवारी रात्री जोरदार भांडणे झाली. त्यानंतर गोपीचंद हा घरी पिंपळगाव कौडा येथे गेला. रात्रीच्या सुमारास त्याची आई हिने, तू शांत हो व जेवण करून घे, असे सांगितले. मात्र, त्याने तसे न करता तो शेजारीच असलेल्या पडवीमध्ये झोपायला गेला. सकाळच्या सुमाराला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

COMMENTS