जळगाव : नातेवाईकांना भेटून घरी येत असताना दुचाकीला वाहणारे जोरदार धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सदरच

जळगाव : नातेवाईकांना भेटून घरी येत असताना दुचाकीला वाहणारे जोरदार धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. सदरचा अपघात मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलाजवळ घडला. मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावातील सुभाष रामराव घोडकी (वय 40) आणि त्यांची पत्नी सोनूबाई सुभाष घोडकी (वय 34) असे मृत दाम्पत्याची नावे आहेत. पती-पत्नी हे मध्य प्रदेशातील (फोपनार येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी दुचाकीने गेले होते. 23 एप्रिलला दोघेजण दुपारी निमखेडी खुर्द येथे येण्यासाठी दुचाकीने निघाले होते. यावेळी त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे.
COMMENTS