Homeताज्या बातम्यादेश

मणिपूरच्या जिरीबामचे शेकडो लोक छावण्यांमध्ये

इम्फाळ ः मणिपूर राज्यातील हिंसाचार पुन्हा एकदा उफाळून आला असून, या भडकलेल्या हिंसाचाराला सुरक्षा दलाने आटोक्यात ठेवले. परंतु परिसरात अजूनही दहशत

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांच्या सभेला रिपाइंने दिले समर्थन
नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सीजन गळती; २२ रुग्ण दगावले
लिव्ह इन रिलेशनशीप अयोग्य नाही म्हणाऱ्या न्यायाधीशाला संपवलं पाहिजे | LOKNews24

इम्फाळ ः मणिपूर राज्यातील हिंसाचार पुन्हा एकदा उफाळून आला असून, या भडकलेल्या हिंसाचाराला सुरक्षा दलाने आटोक्यात ठेवले. परंतु परिसरात अजूनही दहशत दिसते. जिरीबामच्या अनेक संवेदनशील भागांत कलम 144 लागू करण्यात आले आहे. सीआरपीएफच्या तीन अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. शेकडो लोक तात्पुरत्या छावण्यांत राहत आहेत. तीन दिवसांत कुकी तसेच मैतेई समुदायाची किमान 150 घरे पेटवून देण्यात आली. त्यामुळे सुमारे 2 हजार लोक विस्थापित झाले. मणिपूरमध्ये गेल्या वर्षी मे महिन्यात सुरू झालेल्या हिंसाचारानंतरही जिरीबाम जिल्ह्यात शांतता होती. परंतु एका तरुणाचा मृतदेह आढळून आल्यानंतर सोशल मीडियात त्याला जातीय हिंसाचार असल्याचे संबोधण्यात आले.

COMMENTS