Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात यंदा शंभर टक्के पावसाचा अंदाज

पुणे : मान्सून केरळ आणि तामिळनाडू राज्यात धडकला असला तरी, महाराष्ट्रात कधी दाखल होईल, याची प्रतीक्षा शेतकर्‍यांना आहे. मात्र यंदा राज्यामध्ये शंभ

खा. उदयनराजे भोसले यांच्याकडून वाईच्या गणपती घाटावर स्वच्छता मोहीम
मेहुनि म्हणाली लवकर निघा नाहीतर…………
अकोलेकरांच्या दिवाळीची सुरमय सुरुवात

पुणे : मान्सून केरळ आणि तामिळनाडू राज्यात धडकला असला तरी, महाराष्ट्रात कधी दाखल होईल, याची प्रतीक्षा शेतकर्‍यांना आहे. मात्र यंदा राज्यामध्ये शंभर टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे यंदा दुष्काळाचे सावट दूर होण्याची शक्यता आहे. राज्यात यंदा जून ते सप्टेंबर 2024 दरम्यानच्या कालावधीमध्ये 99 टक्के तर कोकण, नाशिक, चंद्रपूर या भागात 100  टक्के आणि उर्वरित भागात साधारणपणे 95 ते 98 टक्के पावसाचा अंदाज आहे. पुण्यात शंभर टक्के पावसाचे प्रमाण असेल, असा अंदाज ज्येष्ठ कृषी हवामानतज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी रविवारी (दि.2) दिला. जून-जुलै महिन्यात पावसाचा खंड पडेल आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस होईल, असेही त्यांनी सांगितले.
 महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी राज्यातील 15 स्टेशनवरील आकडेवारी नूसार किती पाऊस पडेल, याचा अंदाज दिला. साबळे म्हणाले, राज्यामध्ये यंदा काही भागात चांगला पाऊस असणार आहे आणि उर्वरित भागात शंभर टक्क्यांहून कमी पाऊस आहे. त्यामुळे राज्य सरकारने याविषयी उपाययोजना करणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांनी देखील कमी पावसाचे पिक घ्यावे, कमी पावसात येणार्‍या पिकांचे वाण तयार करून त्याचा वापर करायला हवा. यंदा मे महिन्यात तापमान खूप वाढले होते, त्यामुळे त्याचा पावसावर परिणाम झालेला आहे. म्यानमार, पाकिस्तान, भारत, द. आशिया या भागात मार्च ते मे महिन्यातील तापमान प्रचंड होते. राज्यामध्ये सरासरीच्या 99 टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. हा अंदाज कमाल तापमान, सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता, वार्‍याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निकषावर आधारित आहे. गेल्या 30 वर्षांची आकडेवारी या अंदाजासाठी वापरण्यात आली आहे. वार्‍याचा वेग, सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमी आढळल्याने जून, जुलै महिन्यात धुळे, राहुरी, अकोला, पाडेगाव, शिंदेवाही, पुणे, कोल्हापूर येथे पावसात मोठे खंड राहण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे.

ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस – गेल्या काही वर्षांपासून पाऊस उशीरा दाखल होत असतो, त्यामुळे अनेक ठिकाणी पेरण्यांना विलंब होतो. मात्र यंदा वेळेआधीच मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. त्यामुळे कोकणात पाऊस 7-8 जूनमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. यासोबतच सध्या कमी दिवसांत अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड पडतील, असे हवामान राहणार आहे. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील. जून-जुलै महिन्यात पाऊस ओढ देणार आहे.

COMMENTS