Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हुमगाव-बावधन रस्ता राजकीय इच्छाशक्ती अभावी अधांतरी..?

करहर : बावधन-हुमगाव प्रलंबित रस्त्याच्या मार्गावरील वन विभागाचे क्षेत्र. बावधन-हुमगाव रस्ता जावळीतील 40 गावांच्या अस्मितेचा प्रश्‍न आहे. हा रस्ता

कोरिया रिपब्लिकची अंतिम फेरीत धडक
कैद्याचे मृत्यू प्रकरणी कोल्हापूरात सहा जणांवर खूनाचा गुन्हा
सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची जिल्हा माहिती कार्यालयाकडून गावोगावी प्रसिध्दी

बावधन-हुमगाव रस्ता जावळीतील 40 गावांच्या अस्मितेचा प्रश्‍न आहे. हा रस्ता झाल्यास या गावांचा वाई सारख्या शहाराशी संपर्क वाढल्याने अनेक अडचणी निकाली निघणार आहेत. याकरिता स्थानिक आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले व आ. शशिकांत शिंदे यांनी पुढाकार घेऊन वन वनविभागाच्या हद्दतील जागेचा प्रश्‍न निकाली लावून चाळीस गावांचा रस्त्याचा प्रश्‍न सोडविण्यास प्राधान्य कर्म द्यावा.
अशोक सरकाळे,
(ग्रामस्थ आखाडे, ता. जावळी)

तालुक्यातील चाळीस गावांचा प्रश्‍न; कृतीसमिती माध्यमातून रस्त्याचा रेटा
करहर / वार्ताहर : बावधन-हुमगाव हा जावळी व वाई तालुक्यांना जोडणारा अत्यंत गरजेचा रस्ता गेल्या चाळीस वर्षांपासून प्रलंबित असून राजकीय श्रेयवादात हा रस्ता अधांतरी अर्धवट राहिला. तसेच यामुळे जावळी तालुक्यातील चाळीस गावांचा वाई या समृध्द भागासी संपर्क राजकीय इच्छाशक्ती अभावी अधांतरी राहिला आहे.
वाई तालुक्याला जोडणारा महत्वाचा रस्ता असून गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता फक्त जावळी तालुक्यात वन विभागाच्या हद्दीत दोन किलोमीटर अंतरामध्ये प्रलंबित राहिला आहे. या करिता राजकिय रेट्याची आवश्यकता असताना श्रेयवाद यात अडसर असल्याचे निदर्शनास येत आहे. येथे राजकिय इच्छाशक्तीची आवश्यकता आहे. ती प्रभळ असल्यास हा रस्ता चुकटकी सरसी होऊ शकतो.
बावधन-हुमगाव रत्याकरिता चाळीस गावांतील लोकांनी निर्माण केलेली कृतीसमिती त्याकरिता सक्रीय झाली आहे. त्या अंतर्गत गावोगावचे ठराव घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लवकरच जमा झालेल्या ठरावांच्या प्रति आमदार, खासदार, मंत्री महोदयांना सुपुर्द करण्यात येणार आहेत.
नुकतीच कृती समितीची तिसरी मीटिंग करहर येथील विठ्ठल मंदिरात पार पडली असून अशोक सरकाळे, सयाजी शिंदे, रवी परामने, संदीप पवार, रवी गावडे, नितीन गोळे, रवी पार्टे, बापू दुर्गावळे, किरण कळंबे, उल्हास गायकवाड, प्रकाश गोळे, भाऊसाहेब जंगम, सुरेश गोळे, आनंदराव पांगारे, शेखर पोफळे, अमर तरडे, सर्जेराव यादव, दत्तात्रय यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

वाई तालुक्याच्या हद्दीतील रस्ता मार्गी लावण्याचे काम आ. मकरंद पाटील यांच्या माध्यमातून झाले आहे. तरीही उर्वरित रस्ता पूर्णत्वास नेण्यास आज त्यांच्याही सहकार्याची गरज जावळी तालुक्यातील चाळीस गावांना आहे. बावधन-हुमगाव रस्त्याने दोन्ही तालुके जवळ येणार आहेत. मेढा-वाई हे अंतरही कमी होणार आहे. मेढा-वाई नोकरीसाठी जाणार्‍या नोकरदारांना जवळच मार्ग उपलब्ध होणार आहे. तसेच चाळीस गावांतील लोकांना बाजारपेठ त्याच बरोबर अत्यंत निकडीची वैद्यकीय सेवा तात्काळ उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

COMMENTS