Homeताज्या बातम्यासंपादकीय

माणूसकी ओशाळली

आज आपण 21 व्या शतकात वावरण असतांना, तंत्रज्ञानाच्या वल्गना करत असतांना, एआय अर्थात कृत्रित बुद्धीमत्तेचे नवे युग अवतरत असतांना, चांद्रयान मोहीम र

जगणे महागले
भाजप सत्ता आणि वाद
काँगे्रसला ‘बळ’ मिळेल का ?

आज आपण 21 व्या शतकात वावरण असतांना, तंत्रज्ञानाच्या वल्गना करत असतांना, एआय अर्थात कृत्रित बुद्धीमत्तेचे नवे युग अवतरत असतांना, चांद्रयान मोहीम राबवत असतांना, आजही महिलांच्या प्रती बघण्याची आपली दृष्टी बदलत नाही, यातूनच आपली संस्कृती किती पुरूषप्रधान आहे, आणि महिलांना ती केवळ उपभोगाची वस्तू म्हणून पाहते, याचा प्रत्यय येतो. मणिपूर राज्यामध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढल्यानंतर त्याचा व्हिडिओ वेगाने सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरात संतापाची लाट उमटली नसती तर नवलच. सोशल मीडिया, संसद, राज्य विधिमंडळात या घटनेचे पडसाद उमटले. यामागची पार्श्‍वभूमी म्हणजे दोन महिन्यांपासून मणिपूर जळतेय, धुमसतेय, मात्र ही आग विझवण्यासाठी, राज्यकर्त्यांना वेळ नाही, त्यांचे प्रयत्न अपुरे पडत असल्यामुळेच अशा घटना घडत आहेत, त्यामुळे हा संताप प्रत्येकाचा बाहेर येत होता. त्या नराधमाची त्या महिलांची नग्न धिंड काढण्याची हिंमतच कशी झाली? त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करतांना, त्यांना कायद्याची भीती वाटली नाही का? ती धिंड करत असतांना, त्या जमावामध्ये किमान शंभर दीडशे तरी माणसे असतील. त्यातील एकालाही हा प्रकार थांबवावा असे वाटले नाही का? यातून माणूसकी मेली आहे का? असाचा सवाल उपस्थित होतो.
मणिपूरमधील जो हिंसाचार सुरू आहे, तो मोडीत काढण्यासाठी सैन्य दलाला काही तासांचा अवधी पुरेसा होता. मात्र केंद्र सरकारने आपले भाजपचे सरकार असल्यामुळे हस्तक्षेप करण्यास केलेली टाळाटाळ आणि मुख्यमंत्र्यांना पाठीशी घालत या हिंसाचारावर केलेली वरवरची मलमपट्टी यामुळे हा हिंसाचार वाढत राहिला. त्यामुळे त्या नराधमाची मजल वाढली. सरकार, पोलिस, प्रशासन आपले काहीच वाकडे करू शकत नाही, कारण आपली झुंड आहे, याच जोरावर त्या नराधमांनी त्या दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केला, त्यानंतर त्यांची नग्न धिंड काढली. विशेष म्हणजे ही घटना घडून 80 दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर ही घटना उजेडात आली, त्यामुळे व्यवस्थेचे हे अपयश आहे. कायदा व सुव्यवस्था अस्तित्वात नसल्याची ही चिन्हे आहेत. या घटनेची दखल स्वत: सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे पोलिसांनी याप्रकरणी चार जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपीला पकडण्यातही पोलिसांना यश आले आहे. आरोपीला पकडल्याची माहिती मिळाल्यानंतर संतप्त जमावाने या आरोपीचे घरच पेटवून दिले आहे. आरोपीच्या घराला आग लावून जमावाने निषेध नोंदवला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये काही नराधम दोन महिलांना निर्वस्त्र करून त्यांची धिंड काढत असल्याचे दिसत आहे. या महिला विव्हळत, गयावया करत सुटकेची विनंती करताना दिसत आहे. त्यानंतर काही लोक या महिलांना शेतात ओढून नेताना दिसत आहे. याच ठिकाणी या महिलांवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देशभर खळबळ उडाली आहे. ठिकठिकाणी या घटनेचा निषेध नोंदवला जात आहे. आंदोलन केले जात आहे. निदर्शने होत आहेत. संसदेतही काल आणि आज या घटनेचे पडसाद उमटले आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेतही या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे.  या व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि मणिपूर सरकारला चांगलंच फटाकरलं आहे. त्यानंतर पोलिसांनी खडबडून जागे होत चार आरोपींना अटक केली आहे. त्यातील मुख्य आरोपीचे नाव हुउरेम हेरोदास असं आहे. हेरोदासला अटक झाल्यानंतर आणि तोच या घटनेचा करताकरविता असल्याचे समजल्यानंतर त्याच्या शेजारी राहणार्‍यांनी त्याच्या घराला आग लावली आहे. त्यामुळे या संतापाची आग धुमसत राहणार असल्याचे दिसून येत आहे.

COMMENTS