लोणी ः इनोव्हेशन स्टार्टअप क्षेत्रात मोठी संधी सध्या उपलब्ध आहे. या माध्यमातून देश सृमध्दपणे उभा राहत असून ग्रामीम भागातील विद्यार्थी हा कोठेही म
लोणी ः इनोव्हेशन स्टार्टअप क्षेत्रात मोठी संधी सध्या उपलब्ध आहे. या माध्यमातून देश सृमध्दपणे उभा राहत असून ग्रामीम भागातील विद्यार्थी हा कोठेही मागे नाही.योग्य करिअर निवडून पुढे जातांना आपल्या भागाची गरज ओळख प्रवरेच्या प्रवरा रिसर्च इनोव्हेशन स्टार्टअप अँड मिडीयम इंटरप्रायजेस (प्रिझम) फोरम अंतर्गत आपल्या पंखात बळ देण्याचे काम आदर्श आहे. शिवाय केंद्र आणि राज्य शासन ही यासाठी प्रयत्नशील आहे असे प्रतिपादन भारतीय अवकाश संस्था (इस्त्रो) हैदराबाद येथील सह संचालक जी. श्रीनिवास राव यांनी केले.
लोकनेते पद्यभुषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्याा लोणी येथी प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालयात इन्स्पायर महाराष्ट्र – 2024 या तंत्रज्ञान परिसंवाद आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले यावेळी डॉ.राव बोलत होते.संस्थेचे अध्यक्ष आणि महसूल मंञी ना.राधाकृष्ण विखे पाटील,माजी मंञी अण्णासाहेब म्हस्के पाटील,जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनीताई विखे पाटील,खा.डॉ.सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवरा ग्रामीण अभियांत्रिकी महाविद्यालय लोणी यांचे अंतर्गत प्रवरा रिसर्च इनोव्हेशन स्टार्टअप अँड मिडीयम इंटरप्रायजेस (प्रिझम) फोरम ची स्थापना करण्यात आली असून या कंपनी मार्फत इन्स्पायर महाराष्ट्र – 2024 या कार्यक्रमाचा शुभारंभ भारतीय अवकाश संस्था (इस्त्रो) हैदराबाद येथील सह संचालक डॉ.जी.श्रीनिवास राव यांच्या हस्ते झाले. यावेळी राष्ट्रीय संरक्षण संशोधन संस्थेचे श्री.जितेंद्र जाधव, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ.मुकुद शिंदे, माजी विद्यार्थी आणि सी-डॅक इंटरनॅशनलचे सौ.रोहिता आणि श्री.डी.एस.आर.राजू ,दिल्लीचे पोलीस प्रमुख श्रीमती सुमन नलवा!गुंतवणूक व तंत्रज्ञान विषयक सल्लागार डॉ.कृष्णा यार्लीगड्डा, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक श्री.शिवाजीराव जोंधळे,सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एस.एन.हिरेमठ,प्राचार्य डॉ.संजय गुल्हाने, कार्यक्रम समन्वयक डॉ.संजय कुरकुटे,डॉ.चंद्रकांत कडू आदीसह माजी विद्यार्थी उपस्थित होते.
COMMENTS