हल्लीच्या काळात रेल्वेच्या अपघातांची संख्या ही सारखी वाढते आहे. या संदर्भात कोणतीही कारण मिमांसा, थेट उपाय योजना पुढे येताना दिसत नाही.
हल्लीच्या काळात रेल्वेच्या अपघातांची संख्या ही सारखी वाढते आहे. या संदर्भात कोणतीही कारण मिमांसा, थेट उपाय योजना पुढे येताना दिसत नाही.
काल, जळगाव जवळ परांडा स्टेशनच्या आधीच पुष्पक एक्सप्रेस या या गाडीचे अचानक ब्रेक लागले आणि ब्रेक लागल्याच्या ठिकाणी ठिणग्या उडाल्या; परंतु, लोकांचा समज-गैरसमज असा झाला की, रेल्वेला आग लागली, त्यामुळे जीवाच्या भीतीने अनेक प्रवाशांनी रेल्वेमधून उड्या मारण्याचा मार्ग स्वीकारला. मात्र, या उड्या मारताना त्यांनी समोरून रेल्वे ज्या दिशेने येते आहे, त्याच दिशेने उड्या मारल्यामुळे, समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्सप्रेस मध्ये अनेक निष्पाप प्रवाशांचे बळी गेले. पुष्पक एक्सप्रेसचे ब्रेक करकचून दाबले गेले आहेत. त्याशिवाय ठिणग्या उडणार नाहीत, असे समजत आग लागल्याचा समज झाला. आगीच्या समजामुळे किंवा गैरसमजामुळे लोकांनी उड्या मारल्या असतील तर, त्याच्या आधी एवढे कर्कचून ब्रेक दाबण्याची इंजिनिअर किंवा रेल्वेच्या ड्रायव्हरला गरज का भासली? हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कारण, कोणत्याही घटनेला नेमकं कारण काय आहे, हे पाहणं खूप महत्त्वाचे आहे. रेल्वेच्या समोर जर कोणताही प्राणी आडवा आला किंवा कोणतीही गोष्ट आडवी आली तर, इतका तात्काळ ब्रेक लावला जात नाही. कारण, शेकडो प्रवासी रेल्वेमध्ये प्रवास करीत असतात. त्यांच्या जीवाशी खेळ होऊ नये म्हणून, अतिशय कर्कचून ब्रेक दाबण्याची रेल्वेला मुभा नाही. परंतु, तरीही जागेवरच रेल्वे उभी करण्याचा जो प्रयत्न ब्रेक दाबून करण्यात आला आहे, त्याचं नेमकं कारण काय असावं? याची तपासणी सर्वात आधी होणे गरजेचे आहे. परंतु, यामध्ये कारण कोणतंही असलं तरी जो नियमच नाही, त्या नियमाची रेल्वेच्या ड्रायव्हरने नेमकी अंमलबजावणी का केली? हा प्रश्न ही शेवटी उरतोच! त्यामुळे पुष्पक एक्सप्रेस मधून उड्या घेणाऱ्या ज्या प्रवाशांना प्राणाला मुकावं लागलं, त्यांच्या या अपघाताला रेल्वे ड्रायव्हर सदोष म्हणून कारणीभूत आहे; त्यामुळे, सर्वात आधी रेल्वेच्या त्या ड्रायव्हर वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करायला हवा. त्याला, अशी करकचून ब्रेक दाबण्याची सूचना कोणी आणि का दिली? त्या यंत्रणेवर असलेल्यानाही सदोष मनुष्यवधाचा आरोपी मानून त्यांच्या विरोधातही कारवाई होणं गरजेचं आहे! रेल्वे प्रवास हा आतापर्यंत देशात सर्वात सुरक्षित प्रवास समजला जात होता. तो आजही सुरक्षित आहे; परंतु काही मानवी कारणांमुळे अलीकडे जे अपघात होत आहेत किंवा घातपात होत आहेत, ज्यामुळे शेकडो प्रवाशांचा नाहक बळी जातो आहे. याविषयी संपूर्ण तपास होऊन भारतीय लोकांच्या समोर योग्य ती आणि सत्य कारण समोर यायला हवी. कारण, विना कारण प्रवाशांचा जो बळी जातो आहे आणि त्यावर कोणीही गंभीर होऊन चिंता करीत नाही, संवेदनशीलता व्यक्त करत नाही, त्यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न करत नाही, या बाबी या अपघातापेक्षाही अधिक गंभीर आहेत. त्यामुळे पुष्पक एक्सप्रेस चा जो अपघात झाला, त्यात ठार झालेल्या प्रवाशांच्या अपघाताची सखोल चौकशी होणे, खूप गरजेचे आहे. कारण, वारंवार रेल्वेचे अपघात जे भारतामध्ये घडत आहेत, त्यावर कोणताही अहवाल, कोणतही तपास पुरेशा पद्धतीने होत नाहीये. अशा घटना वारंवार घडू लागलेल्या आहेत. भारतीय लोकांना त्यांच्या वित्त आणि जीवित संरक्षणाची हमी भारतीय संविधान देत असताना, त्यांचे प्राण इतके स्वस्त का झाले? याचा यंत्रणेने जाब द्यायला हवा. भारतीय लोकांच्या जीवित्ताची हमी इतक्या सहजपणे उद्ध्वस्त होत असेल तर, त्यावर तात्काळ उपाय योजना करणे गरजेचे आहे.
COMMENTS