Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘मोरया जॉगर्स’च्या वतीने आयर्नमॅन विलास सानप यांचा सत्कार

नाशिक:- सुप्रसिद्ध आर्किटेक्ट विलास सानप यांनी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल मोरया जॉगर्स ग्रुपच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. &nb

करपडी फाटा ते बाभूळगाव दुमाला रस्त्याची दैना
जिल्हा परिषद व नाशिक इंजिनिअरिंग क्लस्टरच्या वतीने रोपण यंत्राचे लोकार्पण
पत्रकार संजय वाघ यांच्या वरील गुन्ह्याचा तपास सी. आय .डी. कडे द्यावा

नाशिक:- सुप्रसिद्ध आर्किटेक्ट विलास सानप यांनी आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण केल्याबद्दल मोरया जॉगर्स ग्रुपच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

     इटली येथे झालेल्या स्पर्धेत सर्व कठीण परिस्थिती आणि अडचणीवर मात करून, शारीरिक क्षमतेचा पूर्ण कस लावत याआधी हाफ आयर्नमॅन झालेले आर्किटेक विलास सानप यांनी ही स्पर्धा १४ तास, ४५  मिनिटं आणि ५७ सेकंद अशा विक्रमी वेळेत पूर्ण करून ‘आयर्नमॅन ‘हा  किताब पटकावला.

     त्यांच्या या अतुलनीय कामगिरीमुळे देशात नाशिकचे नाव उंचावले. त्यांच्या विक्रमी कामगिरीमुळे मोरया जॉगर्सच्या वतीने हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान येथे त्यांच्या सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. मोरया जॉगर्सचे अध्यक्ष भगवान पाटील यांच्या हस्ते त्यांना पुष्पगुच्छ व मानचिन्ह देवून सन्मानीत करण्यात आले. किशोर रुले यांच्याही हस्ते त्यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या सत्कारप्रसंगी त्यांनी इटली येथे आलेले आपले अनुभव व्यक्त करीत नवीन तरुणांना मार्गदर्शन केले. या सत्कार समारंभात मोरया जॉगर्स सर्व सभासद व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

COMMENTS