Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मा. मंत्री पंकजाताई मुंडे यांची श्री. हरिश्चंद्र महादेव यात्रा उत्सवास भेट

पुणे - भाजपच्या नेत्या व मा. मंत्री पंकजाताई मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू असून त्र्यंबकेश्वर ते भीमाशंकर यात्रा सुरू असताना त्यांनी

सर्व आंदोलनांना सारखीच वागणूक मिळावी ः पंकजा मुंडे
पंकजा मुंडेंना मराठा आंदोलकांनी दाखवले काळे झेंडे
पंकजा मुंडेंना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी

पुणे – भाजपच्या नेत्या व मा. मंत्री पंकजाताई मुंडे यांची शिवशक्ती परिक्रमा यात्रा सुरू असून त्र्यंबकेश्वर ते भीमाशंकर यात्रा सुरू असताना त्यांनी आज भीमाशंकर येथून पुणे येथे जात असताना घोडेगाव येथे थांबून श्री हरिचंद्र महादेव यात्रा उत्सवास भेट देत ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या. यावेळी यात्रा कमिटीच्या वतीने पंकजाताई यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला.

भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी दिनांक ४ सप्टेंबर पासून शिवशक्ती परिक्रमा यात्रेत सुरुवात केली असून यात्रेच्या दुसऱ्या दिवशी दिनांक ५ सप्टेंबर रोजी त्रंबकेश्वर ते भीमाशंकर असा त्यांचा यात्रेचा प्रवास होता. त्र्यंबकेश्वर नाशिक येथून सिन्नर, संगमनेर, आळेफाटा, नारायणगाव, भीमाशंकर अशी यात्रा त्यांनी पार पाडली यावेळी ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भीमाशंकर वरून मंचर कडे येत असताना त्या घोडेगाव येथे थांबल्या होत्या घोडेगाव येथे सुरू असलेल्या श्री हरिचंद्र देवस्थान यात्रा उत्सव ला त्यांनी भेट दिली. यावेळी भाजप कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. घोडेगाव येथे यात्रेनिमित्त सुरू असलेल्या निकाली कुस्ती स्पर्धेला त्यांनी भेट दिली. आजही आपल्याकडे लाल मातीतील कुस्ती खेळली जाते आपल्याकडे कुस्ती टिकवण्याची परंपरा सुरू असून यातूनच आपल्या भारताचे तरुण घडत आहे असे उद्गगार त्यांनी काढले. यावेळी हरिचंद्र देवस्थानचे अध्यक्ष प्रशांत काळे, कुंदन काळे, राजेश काळे, भाजपा महिला मोर्चा घोडेगाव शहराध्यक्ष प्रियंका काळे, गणेश घोडेकर, ताराचंद कराळे, विजय काळे, सरपंच ज्योती काळे, यांच्या हस्ते यांचा सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळी, गणेश काळे, सागर काळे, सागर घोलप या सह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS