बीड । प्रतिनिधीबीड तालुक्यातील कपिलधारवाडी (मांजरसुंबा) येथील श्री दत्त संस्थान बालाघाट येथे पौष शुद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त शनिवार, दि.

बीड । प्रतिनिधी
बीड तालुक्यातील कपिलधारवाडी (मांजरसुंबा) येथील श्री दत्त संस्थान बालाघाट येथे पौष शुद्ध पौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त शनिवार, दि. 03 जानेवारी 2026 रोजी भव्य धार्मिक उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा उत्सव प.पु.ष.ब्र. श्री 108 शिवानंद शिवाचार्य महाराज (तमलुरकर) यांच्या कृपाशीर्वादाने तसेच दत्त उपासक वैजिनाथ महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. पौष शुद्ध पौर्णिमा हा दत्तभक्तांसाठी अत्यंत पवित्र व महत्त्वाचा दिवस मानला जात असून, यानिमित्त दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक बालाघाट येथे दर्शनासाठी उपस्थित राहतात. उत्सवानिमित्त सकाळपासून अभिषेक, पूजा-अर्चा, धार्मिक विधी व भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून, या महाप्रसादासाठी जगन्नाथ दगडू शिंदे (कपिलधारवाडी, छ. संभाजीनगर) व गोरख देवराव शिंदे (कपिलधारवाडी) हे अन्नदाते म्हणून लाभ घेणार आहेत. या पावन प्रसंगी पंचक्रोशीतील तसेच परिसरातील सर्व दत्तभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दत्त संस्थान बालाघाट यांच्या वतीने करण्यात आले आहे. बालाघाट येथील श्री दत्त मंदिर हे परिसरातील श्रद्धेचे प्रमुख केंद्र असून येथे सातत्याने होणार्या धार्मिक उपक्रमांमुळे भाविकांमध्ये भक्तीभाव अधिक दृढ होत आहे. भाविकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता, भविष्यात अधिक व्यापक स्वरूपात धार्मिक उत्सव, सेवा उपक्रम तसेच समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले. या सर्व उपक्रमांना प.पु.ष.ब्र. श्री 108 शिवानंद शिवाचार्य महाराज (तमलुरकर) यांचे आशीर्वाद लाभत असून, दत्त उपासक वैजिनाथ महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचा धार्मिक व सामाजिक कार्याचा विस्तार होत आहे. यापुढील प्रत्येक शुद्ध पौर्णिमेला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दत्तसेवेचा लाभ घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS