मुंबई : मनोज जरांगे यांची पदयात्रा आणि प्रजासत्ताक दिनासह अनेक प्रमुख सार्वजनिक कार्यक्रमांमुळे मुंबईतील सर्व पोलिस कर्मचार्यांच्या येत्या 28 जा
मुंबई : मनोज जरांगे यांची पदयात्रा आणि प्रजासत्ताक दिनासह अनेक प्रमुख सार्वजनिक कार्यक्रमांमुळे मुंबईतील सर्व पोलिस कर्मचार्यांच्या येत्या 28 जानेवारीपर्यंतच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या. वैद्यकीय रजेवर असलेल्या पोलिसांना निर्देशातून वगळण्यात आले आहे. अयोध्येत होणार्या अभिषेक सोहळ्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. संवेदनशील भागात रॅलीच्या वेळी गुप्तचर आणि गुन्हे शाखेचे पथक नागरीकांमध्ये तैनात केले जाणार आहे. तसेच प्रजासत्ताकदिन जवळ आला आहे. त्यामुळे या सुट्टया रद्द करण्यात आल्या आहेत.
COMMENTS