Homeताज्या बातम्यामनोरंजन

संकेत- सुपर्णाच्या लग्नात लोकप्रिय मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी

लग्नाची बेडी फेम राघव म्हणजेच अभिनेता संकेत पाठक आणि अभिनेत्री सुपर्णा श्याम यांनी अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर लग्नगाठ बांधली आहे. या दोघांच

न्यायव्यवस्थाच बुडाखाली घेण्याचा डाव
नोकरीच्या आमिषाने पुण्यात 85 युवकांना गंडा | LOKNews24
भंडारदरा धरणात पर्यटकाचा बुडून मृत्यू

लग्नाची बेडी फेम राघव म्हणजेच अभिनेता संकेत पाठक आणि अभिनेत्री सुपर्णा श्याम यांनी अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर लग्नगाठ बांधली आहे. या दोघांचा लग्नसोहळा घरची मंडळी आणि मित्र परिवाराच्या उपस्थितीत थाटात पार पडला. अभिनेत्री निवेदिता सराफ तसेच अन्य लोकप्रिय कलाकारांनी या लग्न सोहळ्याला उपस्थिती दर्शवली होती. संकेत पाठक आणि अभिनेत्री सुपर्णा श्याम यांनी लग्नासाठी मराठमोळा पेहरावा केला होता. दोघांची जोडी खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांकडून या जोडीवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.मागच्या दोन दिवसांपासून दोघांतच्या घरी लग्नाची गडबड सुरू होते. लग्नाआधीच्या विधीचे फोटो देखील यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते. मेंदी, हळदी याचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

COMMENTS