Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माहीमच्या समुद्रातील वादग्रस्त बांधकाम हटवले

राज ठाकरेंच्या इशार्‍यानंतर 12 तासात महापालिकेची कारवाई

मुंबई/प्रतिनिधी ः गुढीपाडव्याच्या सायंकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारला इशारा देत माहीमच्या खाडीतील अवैध बांधकाम एका महिन्यात हटवले नाही त

शेकडो रिफायनरी विरोधक एकवटले
राहत्या पालात तलावाचे पाणी शिरलेल्या आदिवासी बांधावांना मदत
सातारा जिल्हा दुहेरी हत्याकांडाने हादरला

मुंबई/प्रतिनिधी ः गुढीपाडव्याच्या सायंकाळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सरकारला इशारा देत माहीमच्या खाडीतील अवैध बांधकाम एका महिन्यात हटवले नाही तर, आम्ही तिथे गणपतीचे भले मोठे मंदिर उभारू अशी घोषणा केली होती. राज ठाकरेंच्या घोषणेनंतर जिल्हधिकार्‍यांनी महापालिकेला तात्काळ आदेश देत पहाटे बांधकाम हटविण्यात आले.
गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मुंबई महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात या मजारीचा उल्लेख केला होता. हे अनधिकृत बांधकाम जर एक महिन्यात पाडले नाही, तर आम्ही तिथं गणपतीचं मंदिर बांधू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. याची दखल मुंबई जिल्हाधिकार्‍यांसह अन्य प्रशासकीय यंत्रणांनी घेतली. मुंबई शहराचे निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव यांनी बुधवारी तातडीने मुंबई महापालिका आणि पोलीस यंत्रणांना आदेश देत गुरुवारी सकाळी माहिम समुद्रानजीकच्या अनधिकृत अतिक्रमण निष्कासनाची कार्यवाही करण्याचे आदेश दिले. त्यानुसार संबंधितांनी तातडीने कार्यवाही करत अतिक्रमण हटवले. दरम्यान, उपरोक्त इशार्‍यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्‍न निर्माण होऊ नये यासाठी माहिम किनारा परिसरात मुंबई पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रशासनाने योग्य ती दक्षता घेत निष्कासनाची कार्यवाही पूर्ण केली. या कारवाईत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही. दरम्यान, माहिम समुद्रामधील या ठिकाणावर माहिम दर्गा ट्रस्टने मोठा दावा केला आहे. माहिम दर्ग्याचे विश्‍वस्त सुहेल खंडवानी यांनी सांगितले की, ही जागा 600 वर्षे जुनी आहे. राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणं ती आताच बांधलेली नाही. मुळात, हजरत मकदूम अली शाह हे याच जागी बसून हजरत ख्वाजा खिजर अली शाह यांच्याकडून शिक्षण घ्यायचे. ही ऐतिहासिक जागा आहे. तिथे दर्गा उभारण्याचा आमचा कुठलाही विचार नाही.

प्रशासनाच्या तत्परतेवर आश्‍चर्य
राज ठाकरे यांनी काल हे बांधकाम पाडण्याची मागणी करताच काल रात्रीच जिल्हाधिकार्‍यांनी हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी पथकाचीही स्थापना करण्यात आली होती. प्रशासनाने दाखवलेल्या या तत्परतेवर सर्वत्र आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

सांगलीतील अतिक्रमण काढणार ः आयुक्त  पवार
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या सभेत सांगली येथील कुपवाड नजीक झालेल्या अनधिकृत मशीद बांधकाम प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर गुरुवारी घटनास्थळाची महापालिकेच्या नगर रचना विभागाने पाहणी केली. या विभागाच्या अधिकारी यांनी महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्याकडे अहवाल सुपुर्द केला. दुपारी आयुक्त सुनील पवार यांनी माध्यमांशी बोलताना संबंधित ठिकाणी प्राथमिक शाळेचे आरक्षण असल्याचे स्पष्ट केले. या ठिकाणी प्राथमिक शाळेचे आरक्षण आहे. प्रार्थनास्थळाला कोणत्याही प्रकारची परवानगी पालिकेनी दिलेली नाही. कायदेशीर कारवाई करून अनधिकृत बांधकाम तात्काळ काढले जाईल असेही महापालिका आयुक्त सुनील पवार यांनी नमूद केले.

COMMENTS