Homeताज्या बातम्यादेश

सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणात शशी थरूर यांना उच्च न्यायालयाची नोटीस

नवी दिल्ली प्रतिनिधी - सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी काँग्रेस खासदार शशी थरूर यांना देण्यात आलेल्या क्लीन चिटविरोधात दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्

उमरी रस्त्याचे थाटात नगरपंचायतच्या वतीने उद्घाटन !
माजी मुख्यमंत्री सुधाकर नाईक हे खर्‍या अर्थाने जलक्रांतीचे जनक ः  पवार
कौल कुणाला ?

नवी दिल्ली प्रतिनिधी – सुनंदा पुष्कर मृत्यूप्रकरणी काँग्रेस खासदार शशी थरूर यांना देण्यात आलेल्या क्लीन चिटविरोधात दिल्ली पोलिसांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुनंदा पुष्कर मृत्यू प्रकरणी थरूर यांना दोषमुक्त करण्याच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पटियाला हाऊस कोर्टाने 18 ऑगस्ट 2021 रोजी दिलेल्या निकालात सुनंदा पुष्करच्या मृत्यूप्रकरणी शशी थरूर यांची निर्दोष मुक्तता केली. पटियाला हाऊस कोर्टाच्या निर्णयाविरोधात दिल्ली पोलिसांनी केलेल्या अपीलवर दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस खासदार शशी थरूर यांना नोटीस बजावली आहे. हा थरूर यांना मोठा दणका मानला जात आहे.
पटियाला हाऊस कोर्टाच्या निर्णयाविरोधात दिल्ली पोलिसांनी केलेल्या अपीलवर दिल्ली उच्च न्यायालयाने काँग्रेस खासदार शशी थरूर यांना नोटीस बजावली आहे. तथापि, दिल्ली उच्च न्यायालयाने शशी थरूर यांना दिल्ली पोलिसांनी पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात ’विलंब माफी’ मागणार्‍या अर्जावर नोटीस बजावली. न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी 7 फेब्रुवारी 2023 रोजी निश्‍चित केली आहे. ऑगस्ट 2021 मध्ये, एका ट्रायल कोर्टाने शशी थरूर यांची पत्नी सुनंदा पुष्कर यांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. शशी थरूर यांच्याविरोधात कोणतेही ठोस पुरावे नाहीत, असे न्यायालयाने म्हटले होते. सुनंदा पुष्कर यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचे दाखवणारे कोणतेही साहित्य आम्हाला सापडले नाही, असे न्यायालयाने म्हटले होते. त्यामुळे थरूर हे दोषमुक्त झाले होते. पण आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आल्याने शशी थरूर यांना हा धक्का मानला जात आहे. या संबंधी आधीच्या वेळी फिर्यादीने तयार केलेली सामग्री अत्यंत अपुरी असल्याचे न्यायालयाने मानले होते. न्यायालयाने म्हटले होते की, थरूर यांनी सुनंदा पुष्करला आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचे उपलब्ध पुराव्यांतून तरी प्रथमदर्शनी दिसत नाही.

COMMENTS