Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त धान्याचे किट वाटप

लातूर प्रतिनिधी - राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध

कर्तव्यादार दारू पिऊन आलेल्या सहायक पोलिस निरीक्षकाचे निलंबन
मुक्रमाबाद परिसरात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस
मावळ लोकसभेसाठी फेर मतदान व्हावे : श्रीरंग बारणे यांची मागणी

लातूर प्रतिनिधी – राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्याम भोसले यांच्या वतीने मातोळा येथे शनिवारी सायंकाळी गरजूंना माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत धान्याचे किट वाटप करण्यात आले.
यावेळी जिल्हा बँकेचे माजी चेअरमन तथा संचालक अ‍ॅड. श्रीपतराव काकडे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, जिल्हा काँग्रेस माध्यम सेलचे अध्यक्ष पत्रकार हरिराम कुलकर्णी, मारुती महाराज साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्याम भोसले, औसा बाजार समितीचे सभापती राजेंद्र भोसले आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांच्या हस्ते 35 कुटुंबांना प्राथमिक स्वरुपात धान्याचे (किराणा) किट वाटप करण्यात आले. गावातील एकूण 700 कुटुंबांना हे किट वाटप करण्यात येणार आहे याप्रसंगी मातोळा येथील उपसरपंच गणेश भोसले, सोसायटीचे अध्यक्ष व्यंकटराव भोसले, संजय भोसले दीपक भोसले, मुकुंद दारफळकर, राहुल कांबळे, गोविंद भोसले दयानंद भोसले, लातूर शहर जिल्हा सेवादल काँग्रेस अध्यक्ष सुपर्ण जगताप, रेणा साखर कारखान्याचे संचालक संभाजी रेड्डी, सतीश पाटील, मातोळा येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी म्हणून गरजूंना मदतीची भूमिका स्वागतार्ह माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचे मनोगत श्याम भोसले यांनी वाढदिवसाचे औचित्य साधून जो गरजूंना किराणा किट वाटप करण्याचा निर्णय घेतला. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाला दिशा देण्याचे काम यातून होईल, असे सांगत त्यांनी श्याम भोसले व ग्रामस्थांचे कौतुक केले. वाढदिवसाचे औचित्य साधून याप्रसंगी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा मातोळा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या उपस्थितीत गरजूंना किराणा किटचे वाटप करणाात आले.

COMMENTS