Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातार्‍यात सापडली गुप्त होणारी मानवी कवटी; जिल्हा रुग्णालयातील अधिकार्‍यांना डोकेदुखी

सातारा / प्रतिनिधी : गेल्या आठवड्यात सातारा जिल्हा रुग्णालय परिसरात काहीतरी तांत्रिक मांत्रिकांची बैठक जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली झ

पाडेगाव जवळ प्रवासादरम्यान महिलेची बसमध्ये प्रसुती: बसमधील महिलांनी पुढाकार घेत केली प्रसूती
ग्रामसभेबाबत अधिकारीच आले अडचणीत : सुशांत मोरे
बीआरएस भाजपची बी टीम : आ. पृथ्वीराज चव्हाण

सातारा / प्रतिनिधी : गेल्या आठवड्यात सातारा जिल्हा रुग्णालय परिसरात काहीतरी तांत्रिक मांत्रिकांची बैठक जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अध्यक्षतेखाली झाल्याचे माहिती समोर आली आहे. या बैठकीत थोडासा राडा झाल्याने एका मांत्रिकांने उपस्थितांपैकी एकाच्या डोक्याची कवटी मंत्र-तंत्र शक्तीने रस्त्यावर फेकली. तात्काळ उर्वरित लोकांनी मुग गिळल्याप्रमाणे हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका घेतली. ही भूमिका अंगाशी येताच दुसर्‍या मांत्रिकाने मंत्र-तंत्राच्या शक्तीने रस्त्यावर पडलेली कवटी गायब करून सातारा जिल्ह्यातील प्रसार माध्यमांनी चूकीची माहिती प्रसिध्द केल्याचे प्रसिध्दीपत्रक जिल्हा माहिती कार्यालयामार्फत माध्यमांच्या कार्यालयांना धाडले. प्रसिध्दीपत्रक पोहोचले मात्र, कवटी गायब करणार्‍या मांत्रिकापेक्षा जालिम मांत्रिकाने जादू करून पुन्हा कवटी रस्त्यावर टाकल्याच्या प्रकाराने सातारा जिल्ह्यासह शवविच्छेदन गृह परिसरात खळबळ उडाली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष दिवंगत डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या परिवर्तन संस्थेच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर जिल्हा रुग्णालय आहे. त्या जिल्हा रुग्णालयाच्या कंपाउंड लगत गेल्या चार दिवसापूर्वी एक मानवी कवटी पडल्याचे वृत्त माध्यमांच्या कार्यालयास धडकले. तात्काळ माध्यामांच्या प्रतिनिधींनी याबाबत जनतेला या घटनेची माहिती दिली. मात्र, अचानक एका जिल्हा रुग्णालयातील एका मांत्रिकाने आपल्या चेल्या करवी ही कवटी मंत्र-तंत्र विद्येच्या अर्थपुर्ण चमत्काराने गायब केली. त्यानंतर जिल्ह्यात आपल्या कार्यकक्षेत असलेल्या सिव्हीलमधील डॉ. चव्हाण यांनी असे काहीही घडलेले नसल्याचे सांगण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाचा वापर केला. त्यांनी जिल्हा रुग्णालयाचे प्रसिध्दीपत्रक माध्यमांच्या कार्यालयापर्यंत पोहचविण्याचे काम नेहमीप्रमाणे केले. या प्रकारामध्ये जिल्हा माहिती कार्यालयाने त्यांचे कर्तव्य बजावताना नेहमीप्रमाणे तत्परता दाखवली. मात्र, पहिल्या मांत्रिकाची अर्थपूर्ण जादू जास्त काळ चालली नाही. कारण त्याच्यापेक्षा मोठा खविस मांत्रिक तेथे आला. त्याने त्याची मंत्र-तंत्राची शक्ती वापरून रस्त्यावरील कवटी रस्त्यावर टाकण्याची किमया करून माध्यमांच्या प्रतिनिधींची बदनामी टाळली.
चार दिवसापूर्वी दिलेली कवटी गुप्त होवून पुन्हा त्याच परिसरात दिसू लागल्याने जिल्हा रुग्णालयातील पहिला मांत्रिक बुचकाळ्यात पडला. यामध्ये दोन मांत्रिकामध्ये सुरु झालेल्या मंत्र-तंत्राच्या युध्दाचा परिणाम मुर्दागृहात बेवारस पडलेल्या मुडद्यांवर झाला. ते मुडदे आपली कवटी जाग्यावर आहे का? याची पाहणी पोलिसांच्या समक्ष करु लागल्याची चर्चा जिल्हा रुग्णालयाच्या शवविच्छेदन गृह परिसरात होवू लागली आहे.

COMMENTS