Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नगर-मनमाड महामार्गावरील अवजड वाहतूक आठ दिवस बंद

जिल्हा प्रशासनाचे आदेश, आजपासून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर-मनमाड महामार्गावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्याने ऊस वाहतुकीची वाहने व प्रवासी बस वगळता अन्य सर्व अवजड वाहनांची या रस्

महाविकास आघाडी सरकारला शेतकऱ्यांबाबत बेरकी कळवळा
गुटका-मावा माफियांना पोलिसांचा दणका, 10 लाखाचा माल जप्त;11 जणांना केली अटक
बनावट दस्तऐवज करून प्लॉटची परस्पर विक्री, चौघांविरुद्ध गुन्हा

अहमदनगर/प्रतिनिधी ः नगर-मनमाड महामार्गावर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू असल्याने ऊस वाहतुकीची वाहने व प्रवासी बस वगळता अन्य सर्व अवजड वाहनांची या रस्त्यावरील वाहतूक आज रविवारपासून (25 डिसेंबर) बंद करण्यात आली आहे. ती नव्या वर्षदिनी म्हणजे 1 जानेवारी 2023 रोजी मध्यरात्री 12 वाजता खुली केली जाणार आहे. मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ब) नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करीत जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी 25 डिसेंबर 2022 रोजी मध्यरात्री  12 वाजल्यापासून ते 1 जानेवारी 2023 रोजी मध्यरात्री 12 वाजेपर्यंत अहमदनगर-मनमाड या महामार्गावरील अवजड वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश जारी केले आहेत.

या वाहतूक बदलातून ऊस वाहतूक करणारे वाहने (उदा. ट्रक, ट्रॅक्टर व अन्य वाहने) यांना वगळण्यात आले आहे. तसेच प्रवासी बस व अत्यावश्यक मालाची वाहतूक करणारी वाहने आणि रस्ता दुरुस्तीकरीता आवश्यक वाहने तसेच स्थानिक प्रशासनाकडून अत्यावश्यक कारणांसाठी परवानगी दिलेल्या वाहनांना हा आदेश लागू राहणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

असे आहेत पर्यायी वाहतूक मार्ग – अहमदनगर-पुणे-सोलापूरकडून मनमाडकडे जाणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक ही कल्याण बायपास चौकातून अहमदनगर-कल्याण महामार्गावरून आळेफाटा-संगमनेर मार्गे नाशिककड़े किंवा विळदघाट-दूध डेअरी चौक-शेंडी बायपास मार्गे अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरून कायगाव-गंगापूर- वैजापूर-येवला मार्गे जाईल.

-शनि शिंगणापूर-सोनई रोडवरून मनमाड (राहुरीकडे) कडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक अहमदनगर-औरंगाबाद महामार्गावरुन जाईल.

-मनमाड-येवला शिर्डीकडून अहमदनगरमार्गे पुणे-मुंबई-कल्याणकडे जाणार्‍या सर्व प्रकारची अवजड वाहतूक पुणतांबा फाटा- झगडे फाटा (रा.म.मा.क्र. 160 ब)-झगडे फाटा-सिन्नर (रा.म.मा.क्र. 160) सिन्नर-नांदूरशिंगोटे-संगमनेर-आळेफाटा (रा.म.मा.क्र.60) मार्गे जाईल.

– मनमाड-येवलाकडून अहमदनगर-सोलापूर-बीडकडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक पुणतांबा फाटा येथून वैजापूर-गंगापूर-कायगाव-प्रवरासंगम-शेंडी बायपास- विळदघाट-केडगाव बायपास मार्गे जाईल.

-लोणी- बाभळेश्‍वर-श्रीरामपूरकडून अहमदनगरकडे येणारी सर्व प्रकारची अवजड वाहतूक बाभळेश्‍वर-श्रीरामपूर- टाकळीभान-नेवासामार्गे अहमदनगरकडे येईल.

COMMENTS