Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यात पावसाची जोरदार हजेरी

विदर्भ, मराठवाड्यात विजांसह पाऊस

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र शुक्रवारी राज्यभरात प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र शनिवारची सकाळ पावसा

चंद्रपुरमध्ये मधमाशांच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू
मुख्यमंत्री जलसंवर्धन योजना शेतकऱ्यांसाठी ठरणार वरदान !
राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ जिल्हा काँग्रेसचे जेलभरो आंदोलन

पुणे : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र शुक्रवारी राज्यभरात प्रचंड उकाडा जाणवत होता. मात्र शनिवारची सकाळ पावसाने सुरूवात झाली. मराठवाड्यासह विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे शेतकर्‍यांची चिंता वाढण्याआधीच ती दूर झाली आहे.
दक्षिण बांगलादेश आणि पश्‍चिम बंगालमध्ये वाहणार्‍या चक्राकार वार्‍यांमुळे या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून, त्याची तीव्रता वाढण्याचे संकेत आहेत. मॉन्सूनचा आस राजस्थानच्या फलोदीपासून, शिवपूरी, सिधी, रांची ते पश्‍चिम बंगालमधील कमी दाब क्षेत्रापर्यंत सक्रिय आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राज्यात उन्हाचा चटका कायम होता. मात्र शनिवारी राज्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, अकोला, वर्धा, वाशीम, यवतमाळसह अनेक जिल्ह्यात शनिवारी पावसाने हजेरी लावली. तर दुसरीकडे  मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातही काही ठिकाणी शनिवारपासून जोरदार पाऊस पडल्यामुळे शेतकरी सुखावला आहे. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या 15 दिवसांमध्ये तर पाऊस सरासरीपेक्षा 15 टक्के अधिक राहीला. तर 15 ऑगस्टपर्यंत यंदाच्या पावसाळ्यात 105 टक्के पाऊस पडला, असा हवामान विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. ला निना परिस्थिती ऑगस्ट महिन्याच्या शेवटी विकसित होऊ शकते, असा अंदाज आहे.

COMMENTS