मुंबई प्रतिनिधी : गणेशोत्सव ऐन रंगात आला असतानाच बुधवारी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. अनेक जिल्ह्या ढगफुटीसदृश्य प

मुंबई प्रतिनिधी : गणेशोत्सव ऐन रंगात आला असतानाच बुधवारी मध्यरात्रीपासून सुरु झालेल्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. अनेक जिल्ह्या ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून विश्रांतीवर असलेल्या पावसाने कोकण, मुंबई,पुणे, सातारा आणि विदर्भात जोरदार एन्ट्री घेतली. राजधानी मुंबई आणि उपराजधानी असलेल्या नागपुरात वीजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. तर आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी देखील मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मुंबईसह उपनगरात काल अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते. नवी मुंबई, पनवेल, ठाणे परिसरात विजेच्या कडकडासह पाऊस झाला. संध्याकाळी अचानक आलेल्या पावसाने चांगलीच कार्यालयातून घरी जाणार्या नोकरदार वर्गाची चांगली तारांबळ उडाली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार येत्या दोन दिवसांत राज्यात वादळी वार्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबईत पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र संध्याकाळी वाजल्यानंतर अचानक ढग आले आणि पावसाला सुरुवात झाली. मुंबईसह ठाणे, कल्याण, डोंबिवलीतही तुफान पाऊस पडत आहे. अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साचलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. संध्याकाळी घरी जाण्याची वेळ असल्याने काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. यासोबतच कोकणातही वादळी पावसाने हजेरी लावली. कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत जोरदार पाऊस झाला. सिंधुदुर्गात सलग तिसर्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. यासोबतच रत्नागिरी तालुक्यात जोरदार हजेरी लावली आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह पावसाने सुरुवात केली आहे. या पावसामुळे तालुक्यातील काही गावात वीजपुरवठा खंडीत झाला आहे. चिपळूणमध्ये पावसाचा जोर चांगला आहे. तर खेड, दापोलीमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसल्यात. नागपुरातही काल संध्याकाळी 5.45 वाजेच्या सुमाराला विजांसह वादळी पाऊस झाला. त्यामुळे कामवरून घरी परतणारे चाकरमाने आणि गणेशोत्सवात सहभागी असणार्यांची एकच तारांबळ उडाली. दरम्यान राज्यात जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
ढगफुटीसदृश्य पावसाने बाधित झालेल्यांना तात्काळ मदत द्या – पुणे, सातारा, रायगड, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यांच्या काही भागात गेल्या काही दिवसांत झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी दिले आहेत. नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रायगड जिल्ह्याच्या काही भागांमध्ये ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस झाला आहे. मुख्य सचिवांसह पुणे, सातारा जिल्हाधिकार्यांकडून मुख्यमंत्र्यांनी या अतिवृष्टीची माहिती घेतली असून या पावसामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तातडीने आवश्यक ती मदत पुरविण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.
पावसाचा जोर वाढण्याचा हवामान विभागाचा इशारा – पुढील चार-पाच दिवस हवामान विभागाने राज्यात विशेषतः कोकण पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्र तसेच विदर्भातही पावसाचा जोर वाढण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी देखील होऊ शकते. त्या संदर्भामध्ये संबंधित जिल्हा प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी व कुठलीही आपत्ती आल्यास मदतीसाठी तयार राहावे असे अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. कालही ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याची घटना घडली. महाराष्ट्रासह दक्षिण दक्षिणेकडील राज्यातही जोरदार पाऊस सुरू आहे.
COMMENTS