नवी दिल्ली/प्रतिनिधी ः शिवसेना नेमकी कुणाची ? हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतांनाच, पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण याचा फैसला अद्याप निवडणूक आयो
नवी दिल्ली/प्रतिनिधी ः शिवसेना नेमकी कुणाची ? हा वाद सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असतांनाच, पक्षाचे चिन्ह धनुष्यबाण याचा फैसला अद्याप निवडणूक आयोगाकडे प्रलंबित आहे. यावर मंगळवारी सुनावणी झाली. यासंदर्भातील युक्तीवाद झाल्यानंतर निवडणूक आयोगाने याची सुनावणी शुक्रवारी 20 जानेवारी रोजी होणार आहे.
धनुष्यबाण हे पक्षचिन्ह कुणाला मिळणार? याबाबत दिल्लीतील केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सध्या सुनावणी झाली. पक्षातंर्गत निवडणुका घेऊ द्या, कोर्टाचा निर्णय येईपर्यंत निकाल देऊ नये अशी विनंती आयोगाला ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली. आता या मुद्द्यावरील पुढील सुनावणी निवडणूक आयोगात शुक्रवारी (ता. 20) होणार आहे. ठाकरे गट आणि शिंदे गटाने यापूर्वी कागदपत्रे सादर केली होती. निकाल आपल्या पदरात पडावा यासाठी दोन्ही गटात प्रतिज्ञापत्र आयोगाला सादर करण्याची स्पर्धाच लागली होती. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत 23 जानेवारीला संपत आहे, त्यामुळे दुहेरी कात्रीत ठाकरे गट सापडला आहे. अनिल परब म्हणाले, शिंदे गटाच्या कागदपत्रातील त्रूटी आयोगासमोर आम्ही आम्ही दाखवून दिल्या आहेत. आता यापुढील सुनावणी शुक्रवारी सुनावणी होईल. शिवसेना नेते अनिल देसाई म्हणाले, शिंदे गटाच्या वकीलाने जे मुद्दे मांडले ते कसे चुकीचे होते हे आमच्या वकीलाने आयोगात स्पष्ट केले आहे. एकीकडे शिंदे गट शिवसेनेची घटना मान्य करतात, दुसरीकडे घटनेवर बोटही ठेवतात. देशाच्या लोकशाहीसाठी महत्वाचा निर्णय आहे.
COMMENTS