Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ओव्हरलोड वाहनावर कडक कारवाई करणार्‍या महिला उप प्रादेशिक अधिकार्‍यास दमदाटी

अहमदनगर/प्रतिनिधी ओव्हरलोड वाहनांवर कारवाई केल्याच्या रागातून चार ते पाच जणांनी आरटीओ कार्यालयाच्या कक्षात जाऊन महिला आरटीओ अधिकार्यास दमदाटी धम

पंतगाच्या मागे धावताना 13 वर्षांच्या मुलाचा दम लागुन मृत्यू
शिक्षक भारती संघटनेची कोपरगाव तालुका कार्यकारणी जाहीर
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता नागरिकांच्या जीवाशी खेळl पहा LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी ओव्हरलोड वाहनांवर कारवाई केल्याच्या रागातून चार ते पाच जणांनी आरटीओ कार्यालयाच्या कक्षात जाऊन महिला आरटीओ अधिकार्यास दमदाटी धमकावणी करीत शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना घडली.नगर पुणे रोड वरील चांदणी चौकातील आरटीओ कार्यालयात घडली.
या बाबतची माहिती अशी की नोव्हेंबर 2021 मध्ये जनसेवा ट्रान्सपोर्टची वाहने भार क्षमतेपेक्षा जास्त वाहतुक करीत होते त्यामुळे आर टी ओ आयेशा शेख यांनी मोटार वाहन कायदा 1988 चे कलम 193/ 194 अन्वये फिरोज शफि खान यांच्या जनसेवा ट्रान्सपोर्टच्या वाहनांवर कारवाई केली होती. तेव्हा आयेशा शेख तसेच फिरोज शफि खान व बाबासाहेब बलभीम सानप यांच्यात बोलाचाली झाली होती. त्यावेळी त्यांनी तुम्हाला पाहुन घेऊ असा दम दिला होता.
त्या नंतर दि.8 मे रोजी राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह निमित्त. शेख यांना महालेखाकार कार्यालय कामकाज देण्यात आलेले होते. त्या त्यांच्या कार्यालयात शासकिय कर्तव्य पार पाडत असता जनसेवा ट्रान्सपोर्टचे वाहनावर ओव्हरलोड बाबत रितसर कार्यवाही केली असल्याचा राग मनात धरुन फिरोज शफि खान (रा. 750 मंगलगेट अ.नगर) बाबासाहेब बलभीम सानप (रा.बी.7 राज चेंबर्स कोठला अ.नगर) यांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय असल्याने यांचे संबंध आहेत. व ते गेल्या काही वर्षापासुन शेख यांच्या कार्यालयात येवुन वारंवार धमक्या देत असतात की, आम्ही तुमची नोकरी घालवू. आम्ही तुमच्या विरुध्द न्टी करप्शन कार्यालयात जावुन तक्रार करीन असे म्हणुन शेख यांना नेहमी धमकावत असतात. दि.8 रोजी दुपारी फिरोज शफि खान,. बाबासाहेब बलभिम सानप व त्यांचे सोबत 2 ते 3 अज्ञात इसमांनी अनाधिकृत रित्या शेख यांच्या कॅबीनमध्ये प्रवेश करुन त्यांना म्हणाले की, आमच्या जनसेवा ट्रान्सपोर्टच्या गाडयांवर कारवाई करायची नाही. असे म्हणून नाहीतर तुमची नौकरी घालवतो. आमच्या गाडया यापुढे सुध्दा ओव्हरलोड चालतील असे म्हणुन शेख यांच्यासोबत शाब्दीक बाचाबाची करुन त्यांचा भावनिक छळ केला व त्या करीत असलेल्या शासकिय कामकाजात अडथळा निर्माण केला आहे शासकिय कामकाजात बलपुर्वक मज्जाव केला.तसेच त्यांना म्हणाले की, आम्ही तुमच्या विरुध्द तुमच्या वरिष्ठांकडे केलेल्या तक्रारी मागे घ्यावयाच्या असतील तर तुम्हाला आमच्या सोबत तडजोड करुन आम्हास पैसे दयावे लागतील तुम्ही आम्हास पैसे दिले नाही तर आम्ही तुमच्या विरुध्द दिलेल्या तक्रारी मागे घेणार नाही असे म्हणुन तेथुन ते सर्वजन निघुन गेले.
त्यानंतर शेख यांच्या खाजगी वाहनावरील तात्पुरते चालक श्रीकांत गुंजाळ हे त्यांचे घराचे लाईट बिल भरण्यासाठी जात असतांना त्याचा दोघानी महिंद्रा कंपनीची जीप (क्रमांक एम एच 12 जी यू 5005) मधून छुपा पाठलाग केला.
या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी उप प्रादेशिक मोटार वाहन निरीक्षक आयेशा अंजुम अश्पाक हुसेन शेख (रा. नशेमन बंगला नं. 2, एन. आर कंस्ट्रक्शन, सुरभी हॉस्पीटल मागे, गुलमोहररोड, कॉलनी, अ.नगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन फिरोज शेख व बाबसाहेब सानप सह अन्य इसमांविरुध्द भा.द.वि. कलम 447,186, 385, 504, 506, 34 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केलीअसुन अधिक तपास पोलिस हवालदार पालवे करीत आहे.

COMMENTS