नवी दिल्ली प्रतिनिधी - देशभरात ईडी आणि सीबीआयच्या कारवायांवरून विरोधक हल्लाबोल करत असतांनाच, शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvin
नवी दिल्ली प्रतिनिधी – देशभरात ईडी आणि सीबीआयच्या कारवायांवरून विरोधक हल्लाबोल करत असतांनाच, शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) यांनी ईडी, सीबीआयवरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. विरोधकांना राष्ट्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवली जात आहे. तरीही भाजपच्या हाताला काही लागत नाही. केवळ एका दिवसासाठी सीबीआय-ईडी माझ्या ताब्यात द्या, अर्धा भाजप तुरुंगात जाईल, असे म्हणत केजरीवाल यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
दिल्ली महापालिकांची ऱणधुमाळी सुरू असतांना, केजरीवालांनी हे वक्तव्य केले आहे. दिल्ली एमसीडी निवडणुका जिंकण्यासाठी सर्व पक्षांनी प्रचार मोहिमेवर भर दिला आहे. गेल्या 15 वर्षांपासून एमसीडीमध्ये भाजपची सत्ता आहे आणि ती सत्ता कायम ठेवण्यासाठी भाजप सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपसमोर आम आदमी पक्षाचे कडवे आव्हान आहे. अरविंद केजरीवाल यांनी भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप करत म्हटले की, आम्ही एमसीडीला गेल्या 5 वर्षांत 1 लाख कोटी रुपये दिले, पण भाजपच्या लोकांनी सर्व पैसे हडप केले. या लोकांना मोठा भ्रष्टाचार केला आहे. यांनी थोडंतरी काम केले असते तरी पालिकेच्या कर्मचार्यांना वेतन मिळाले असते. केंद्र सरकारने आपचे नेते सत्येंद्र जैन व मनिष सिसोदिया यांच्यावर ईडीच्या धाडी टाकल्या. याबाबत विचारलेल्या प्रश्नावर केजरीवाल म्हणाले की, एका दिवसासाठी सीबीआय-ईडी माझ्याकडे सोपवा, भाजपचे निम्मे लोक तुरुंगात जातील. आमच्यावर अनेक खटले दाखल झाले, तरीही काहीही सिद्ध होऊ शकले नाही. हे लोक सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांना भ्रष्ट म्हणतात. मनीषने दारू घोटाळा केला, 10 कोटी खाल्ल्याचे त्यांचे म्हणणे आहे. इतके छापे टाकूनही काही सापडलं नाही, मग 10 कोटी रुपये गेले कुठे? असा सवाल देखील केजरीवालांनी केला आहे.
COMMENTS