Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुंजवणी बंद जलवाहिनीचे काम जोमात

पुणे : थेट जलवाहिनीतून तब्बल 21 हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाद्वारे पाणी वितरण करण्याचा जलसंपदा विभागाच्या देशातील पहिल्या महत्त्वाकांक्षी गुंजवण

मुजोरीला वेसण घालण्याची गरज!
वारे उलट्या दिशेने फिरले !
नेवाशातील अमरनाथ गु्रपच्या वतीने देवगड रस्त्यावर वृक्षारोपण

पुणे : थेट जलवाहिनीतून तब्बल 21 हजार हेक्टर क्षेत्राला सिंचनाद्वारे पाणी वितरण करण्याचा जलसंपदा विभागाच्या देशातील पहिल्या महत्त्वाकांक्षी गुंजवणी प्रकल्पाचे प्रत्यक्ष काम जोरात सुरू झाले आहे. उच्च न्यायालयात दाखल याचिका, करोनामध्ये बंद पडलेले काम, अशा विविध समस्यांमधून मार्ग काढत भूमिगत जलवाहिन्या जोडणीच्या कामाला प्रारंभ करण्यात आला आहे. थेट बंद जलवाहिनीतून सिंचनासाठी पाणी वितरण करणार्‍या गुंजवणी प्रकल्पाच्या कामात सात किलोमीटर भूमिगत जलवाहिन्यांची जोडणी पूर्ण झाली आहे. उर्वरित जलवाहिन्या जोडण्याचे काम सध्या सुरू आहे. शेतकर्‍यांना थेट बंद जलवाहिनीतून सिंचनासाठी पाणी वितरित करणारा गुंजवणी प्रकल्प केंंद्र सरकारच्या पीआयएन (पाइप्ड इरिगेशन नेटवर्क) या धोरणानुसार साकारण्यात येत आहे.

COMMENTS