Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याला चक्क गुजराती माध्यमाची प्रश्नपत्रिका

बीड प्रतिनिधी - बीडमध्ये शिक्षकाच्या निष्काळजीपणामुळे नवोदयचा पात्रता परीक्षेमध्ये एका मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याला गुजराती माध्यमांची प

राहात्यातील पथदिवे बंदमुळे नागरिकांना मनस्ताप
पक्वानांच्या ताटात पालीची लघुशंका!
मास्टरमाईंडचा शोध घेतला जाईल : अजित पवार | LOK News 24

बीड प्रतिनिधी – बीडमध्ये शिक्षकाच्या निष्काळजीपणामुळे नवोदयचा पात्रता परीक्षेमध्ये एका मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याला गुजराती माध्यमांची प्रश्नपत्रिका देण्यात आली. त्यामुळे वर्षभर अभ्यास करून देखील या विद्यार्थ्याला नवोदय पात्रता परीक्षा देता आली नाही. संदीप मुळीक अस या विद्यार्थ्यांचं नाव आहे. हा विद्यार्थी शिरूर कासार तालुक्यातल्या खोकरमोहा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचवीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. नवोदय परीक्षा पात्रतेसाठी त्याने फॉर्म भरला होता आणि त्यानंतर परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर त्याला मराठी ऐवजी गुजराती माध्यमांची प्रश्नपत्रिका देण्यात आली. याबद्दल त्याच्या पालकाने शिक्षकांकडे तक्रार केली. मात्र शिक्षकांनी देखील उडवाउडवीची उत्तर दिल्याने भाषेशी तडजोड करून नाविलाजाने विद्यार्थ्याला पेपर द्यावा लागला. परीक्षेचा फॉर्म भरताना शिक्षकाने गुजराती भाषा निवडल्यामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्याला गुजराती भाषेतील पेपर सोडविण्याची वेळ आली आहे. शहराच्या कालिकादेवी माध्यमिक विद्यालयातील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला असून, शिक्षकाच्या चुकीचा फटका विद्यार्थ्याला बसला आहे. नवोदय परीक्षेचा पेपर होता. जिल्हा परिषद माध्यमिक शाळा आणि कालिकादेवी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी नवोद्य परीक्षा दिली. दरम्यान कालिकदेवी परीक्षा केंद्रावर खोकरमोहा येथील संदीप सखाराम मुळीक हा विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी आला होता. या वेळी सर्व विद्यार्थ्यांना मराठी भाषेतून प्रश्नपत्रिका मिळाली. पण संदीपला मात्र गुजराती भाषेतील प्रश्नपत्रिका मिळाली होती.

COMMENTS