अतिथी देवो भव : अजित पवारांचा राखीव सूटमध्ये अमित शाहांचा मुक्काम

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अतिथी देवो भव : अजित पवारांचा राखीव सूटमध्ये अमित शाहांचा मुक्काम

पुणे : केंद्रित गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यावर आहेत. दरम्यान रविवारी त्यांच्या उपस्थितीत पुणे शहरात विविध कार्यक्रम पार पडणार आ

टँकरमधून डिझेल चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश
चंद्रकांतदादांची क्षमता पैशात मोजता येणार नाही… त्यांनी राज्यात १०५ आमदार निवडून आणले…
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची गोपीनाथ गडाला भेट

पुणे : केंद्रित गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौ-यावर आहेत. दरम्यान रविवारी त्यांच्या उपस्थितीत पुणे शहरात विविध कार्यक्रम पार पडणार आहे. त्यामुळे आज आणि उद्या अमित शाह हे पुणे शहरात मुक्कामी राहणार आहेत.
पुण्यातील त्यांचा हा मुक्काम व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमधील उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राखीव सूटमध्ये होणार आहे. पवारांनी आपला राखीव सूट शाह यांना उपलब्ध करून देत महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचे दर्शन पुन्हा एकदा घडवले. पुण्यातील व्हीव्हीआयपी सर्किट हाऊसमध्ये दोन राखीव सुट आहेत. त्यातील एक सूट हा कायमस्वरूपी मुख्यमंत्र्यांसाठी राखीव असतो तर दुसरा सूट उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यासाठी राखीव असतो. उपमुख्यमंत्र्यांचा हाच सूट अमित शाह यांच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दरम्यान पुणे मुक्कामी असणाऱ्या अमित शाह यांच्यासाठी खाजगी ठिकाणाची सोय नको असं शाह यांच्या कार्यालयाने जिल्हा प्रशासनाला कळवलं होतं. पुण्यात राज भवन आहे. परंतु या ठिकाणी राष्ट्रपती, पंतप्रधान आणि राज्यपाल यांचीच व्यवस्था करण्यात येते. त्यामुळे शाह यांच्या निवासासाठी व्हीव्हीआयपी येथील पवारांच्या सूटबाबत विचारणा करण्यात आली. अजित पवारांपर्यंत हा विषय जाताच त्यांनी तातडीने हा सूट शाह यांच्या निवासासाठी उपलब्ध करून दिला.

COMMENTS