अकोले तालुक्यात स्टार्टअप यात्रा उत्साहात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अकोले तालुक्यात स्टार्टअप यात्रा उत्साहात

अकोले प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात स्टार्टअप व नाविन्यत

चेतन पिपाडा बनले कमर्शियल पायलट
रेमडीसिविरच्या बाटलीत चक्क भरले सलाइनचे पाणी ; नीचपणाचा कळस, कोरोना रुग्णाच्या जीवाशी खेळ
राज्यात पुढील पाच दिवस उष्णतेची लाट

अकोले प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत आज अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात स्टार्टअप व नाविन्यता यात्रेचे उत्साहात स्वागत करण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यात 22 ऑगस्ट पासून या स्टार्टअप यात्रेला अकोले तालुक्यातून सुरुवात झाली.या रथ यात्रेचे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये आगमन झाले.त्या ठिकाणी अकोले येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजूर व पॉलिटेक्निक कॉलेज च्या विद्यार्थ्यांनी दुतर्फा उभे राहून टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
येथे स्टार्टअप यात्रे बरोबर आलेले समन्वयक आशिष ढगे व योगेश काळे यांचे शाल व फुलांचा बुके देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी स्वागत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर पॉलिटेक्निक कॉलेज चे प्राचार्य डॉ.आर.डी.पल्हाडे यांनी या यात्रेचा उद्देश स्पष्ट केला. तर आशिष ढगे यांनी स्टार्टअप यात्रेची सविस्तर माहिती देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, नागरिकांनी, शेतकर्‍यांनी, उद्योजकांनी आपल्या कल्पना व संशोधन यांच्या सह या स्टार्टअप यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन केले.तसेच या कल्पनेला प्रत्यक्षात उतरविन्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र विभाग सुरू केला असून त्या विभागामार्फत सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या माध्यमातून आपण लघुउद्योग सुरू करावा व नोकरीच्या मागे न लागता दुसर्‍याला रोजगार द्यावा असे आवाहन केले.यावेळी तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी ही उपस्थित होते. शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था राजूरचे प्राचार्य तथा यात्रेचे नोडल अधिकारी कुटे यांनी श्रीफळ वाढवून यात्रेचे उद्घाटन केले. त्यानंतर ही स्टार्टअप यात्रा अकोले टेक्निकल कॅम्पस च्या परिसरात आली.त्याठिकाणी प्रा.बाळासाहेब शेटे यांनी यात्रेचे स्वागत केले व स्टार्टअप यात्रेचा उद्देश सांगून आपल्या नवीन कल्पनेला वाव देण्यासाठी यात सहभागी व्हावे असे स्पष्ट केले.या अकोले महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी महाविद्यालयाचे वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या शंका विचारून या यात्रेचा उद्देश समजावून घेतला.यावेळी प्राचार्य कुटे व यात्रेचे समन्वयक आशिष ढगे यांनी यात्रेचा उद्देश स्पष्ट करून यात नोंदणी करावी असे आवाहन केले. यावेळी सर्व उपस्थितितांना स्टार्टअपची चित्रफीत दाखविण्यात आली. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.बाळासाहेब शेटे यांनी केले. या नंतर ही स्टार्टअप यात्रा आदिवासी भागातील मवेशी येथे गेली. या वेळी प्राचार्य आर.डी. पल्हाडे, प्राचार्य कुटे, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, प्रा. बाळासाहेब शेटे,पॉलिटेक्निक कॉलेजचे,औद्योगिक प्रशिक्षण संस्था अकोलेचे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे, एमबीए कॉलेजचे, व अकोले महाविद्यालयाचे तसेच तालुक्यातील इतर कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, निदेशक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या यात्रेच्या यशस्वीते साठी आय.टी. आय अकोले राजुरचे गट निदेशक मच्छिद्र गायकर, नागरे, विजय वर्पे निदेशक, कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. या कामी गट शिक्षणाधिकारी जालिंदर खताळ, प्राचार्य कुटे, प्राचार्य विद्याचंद्र सातपुते, प्राचार्य डॉ आर डी पल्हाडे, प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, प्राचार्य डॉ. प्रशांत तांबे यांचे मार्गदर्शन लाभले.

COMMENTS