बीड : नगरपरिषदचे निवडणूका पार पडल्यानंतर बीड नगरपरिषदेची अर्थसंकल्पीय व सर्वसाधारण सभा दि.27 फेब्रुवारीला सुरू होऊन 28 फेब्रुवारी रोजी संपली या द

बीड : नगरपरिषदचे निवडणूका पार पडल्यानंतर बीड नगरपरिषदेची अर्थसंकल्पीय व सर्वसाधारण सभा दि.27 फेब्रुवारीला सुरू होऊन 28 फेब्रुवारी रोजी संपली या दोन दिवसीय सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदपवार चे गटनेते खुर्शीद आलम यांनी विकास कामांच्या अनुभवानुसार सामाज हिताचे अनेक मुद्द्यांवर चर्चा करून विकासकामांच्या मागण्या केल्या यामध्ये नियमित पाणीपुरवठा करा, नियमित स्वच्छता करा, प्रत्येक विद्युत खंब्यावर लाईट लावा, सार्वजनिक ठिकाण म्हणजेच आठवडी बाजार, खासबाग अडक मार्केट, नवी भाजी मंडई, प्रकाश आंबेडकरनगर, सरकारी दवाखाना, कंकालेश्वर मंदिर, शहंशाहवली दर्गा, वडार वाडा, किल्ला मैदान सह बीड शहरातील समशान भूम्या आणि कब्रस्तानात विंधन विहीर घेऊन सिमेंट टाक्या बसवून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, प्रभागाचे जनसंख्यानुसार विकास कामाला प्राधान्य द्यावे, मुदत संपलेल्या कॉम्प्लेक्स मधील गाड्यांच्या फेर लिलाव करावे, न.प.चे ओपन स्पेस वर गाळे काढून भाडेतत्त्वावर द्यावे, बोगस बिलांची विशेष लेखापरीक्षण झाल्या शिवाय गुत्तेदारांना बिले देण्यात येऊ नये, खासबाग ते मोमीनपुरा नदी पुलाचे काम त्वरित सुरू करावे, खासबाग आळत मार्केट रोड ते सफीलच्या बाजु बाजुने चांदणी चौकापर्यंत पुल बांधुन रस्ता करावे, मोमीन पुरा नालेला एका साइड ने रस्ता तर दुसर्या बाजुने नाला करावे, फुटे नल कडून धांडे नगर नर्सरी रोड वर येणारे पुराचे पाणी रेल्वे ब्रिज चे बाजुने बिंदू सुरा नदीत सोडावे तसेच शिंगणाचे डोंगरावरून मोमीन पुर्यात येणार्या पुराचे पाणीला बार्शीनाका चौकाच्या बाजुने बिंदूसुरा नदीत सोडावे, बालेपिर नालेला संरक्षण भिंत बांधावे, आठवडी बाजारामुळे सुभाषरोड वर ट्राफिक जाम होतो म्हणून बाजाराला जागा उपलब्ध करावी, जुनी भाजी मंडई बुंदेलपुरा येथे शॉपिंग कॉम्प्लेक्स करावे, महात्माफुले मंडीतिल इमारतीच्या ठिकाणी भाजी मंडई सुरू करावे जेणेकरून मुख्य रस्त्यावर ट्राफिक होणार नाही, बोगस गुंटवारीला लगाम कसुन गुंठेवारी चालु ठेवा, आठवडी बाजारचे टेंडर ओपन करावे, दर पंधरा दिवसाला जनता दरबार ठेवावे, अशोकनगर ते मक्का चौकापर्यंत चा रस्ता करा, प्रभाग क्रमांक 22,23,24 मध्ये मंजूर असलेल्या कामे त्वरित सुरू करावे, अकरा वर्षांपूर्वीच नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत बार्शी नाका चौकाला मिसाईल मॅन व माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.कलाम यांचे नाव देण्यात आलेले असतानाही बार्शीनाका चौकाला हायवे वाल्यांनी तोडून टाकले त्यांचावर कायदेशीर कारवाई करा असे विविध मागण्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदपवार चे गटनेते खुर्शीद आलम यांनी आपल्या सर्व नगरसेवकांच्या सहकार्याने ठेवले आहेत, शेवटी आमची मागणी मान्य करून न.प.चे वसुली विभाग तळमजल्यावर आणले म्हणून खुर्शीद आलम यांनी अध्यक्ष मॅडम, मुख्याधिकारी साहेब आणि उपनगराध्यक्ष साहेबांचे विशेष आभार व्यक्त केले आहे,

COMMENTS