Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे भाजपमधील गटबाजी चव्हाटयावर

आमदार भीमराव तापकीय यांच्याकडून जाहीर नाराजी

पुणे/प्रतिनिधी ः भाजपमध्ये सहजा व्यक्तीला महत्व देण्याऐवजी पक्षाला प्रथम प्राधान्य देण्यात येते. त्यामुळे पक्षाची शिस्त नेहमीच ओळखली जाते. त्यामु

सज्जनगडावर लवकरच रोप-वे; 10 कोटींचा निधी मंजूर
नरेगाच्या कामाची इंजिनियर आणि ऑपरेटरनी वाट लावली
पुराच्या पाण्यात अडकलेल्या 22 वाहनचालकांना वाचवण्यात यश!

पुणे/प्रतिनिधी ः भाजपमध्ये सहजा व्यक्तीला महत्व देण्याऐवजी पक्षाला प्रथम प्राधान्य देण्यात येते. त्यामुळे पक्षाची शिस्त नेहमीच ओळखली जाते. त्यामुळे इतर पक्षाप्रमाणे भाजपमध्ये गटबाजी नसल्याचे चित्र होते. मात्र आता भाजपला सुद्धा गटबाजीचे ग्रहण लागल्याचे समोर आले आहे. पार्टी विथ डीफरन्स म्हणून ओळख असलेल्या पुणे भाजपात अंतर्गत वाद हा चव्हाट्यावर आला आहे. आमदार भीमराव तपकीर यांनी पक्षातील राजकारणाविरोधात खदखद व्यक्त केली आहे. भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या संकल्पनेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देशभर गाजलेल्या भाषणांचा ’धडाकेबाज लोकनेते देवेंद्र फडणवीस’ या पुस्तकाचे प्रकाशन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या जाहीर कार्यक्रमात आमदार भीमराव तापकीर यांनी नाराजी व्यक्त केली.
पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला वेळ होता. प्रमुख पाहुणे चंद्रशेखर बावनकुळे आणि चंद्रकांत पाटील हे कार्यक्रमस्थळी आले नव्हते.

यामुळे आमदार भीमराव तापकीर यांना बोलण्यास सांगण्यात आले. तापकीर यांनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली. मात्र, यावेळी त्यांनी पक्षातील गटबाजीच्या राजकारणावर बोलायला सुरुवात केली. शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांना उपरोधिक टोला लागावत त्यांनी नाराजी व्यक्त केली. भीमराव तपकीर म्हणाले, शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी मला आज बोलण्याची संधी दिली. कोणी नाही म्हणून कोणालातरी बोलायला उभे केले पाहिजे म्हणून मला उभे केले. मी पण समजून गेलो चला आता कोणी नाही तर मी आहे. कुठे तरी बोलले पाहिजे म्हणून आपली सुरवात केली. माझे भाषण होईपर्यंत कोणीतरी नेता येईल आणि पुढे बोलेल. मी त्या अनुषंगानेच बोलत होते. मला नेमका बाहेर आवाज आला आणि कळले आता आपण आपले भाषण आवरत घ्यावे. कारण आता प्रत्येक नेता येऊन बोलणार आहे. खर तर आज मी अध्यक्ष जगदीश मुळीक यांचे आभार मानतो. कारण, कधी तरी तुम्ही मला बोलायला संधी दिली. कारण काय होत प्रत्येक कार्यक्रमात मी पाठीमागे कुठेतरी बसलेलो असतो. दरम्यान, तापकिर यांच्या या व्यक्तव्यामुळे माजी आमदार मेधा कुलकर्णी या त्यांच्याकडे पाहू लागल्या. यावर देखील तपकीर यांनी भाष्य केले. तपकीर म्हणाले, ’मेधाताई तुम्ही माझ्याकडे असे पाहू नका, मी खरे तेच बोलतोय. आज मला संधी फक्त एव्हढ्याकरिता दिली की आज कोणीही नेते स्टेजवर उपस्थित नाहीत’. तपकीर यांच्या या व्यक्तव्यामुळे पक्षातील नाराजी पुढे आली आहे.

COMMENTS