पुण्यातील हवेली तालुक्यात ग्रेनेड केला निकामी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुण्यातील हवेली तालुक्यात ग्रेनेड केला निकामी

पुणे : पुण्यातील हवेली तालुक्यामध्ये एका स्मशानभूमीजवळ एक ग्रेनेड आढळून आले आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच

बंद कारखान्यांचे भूखंड ताब्यात घेण्याबाबत काय कारवाई केली ?
पीएमआरडीए क्षेत्रात विकासकामांना मिळणार वेग
केरळमध्ये बोट उलटून 21 पर्यटकांचा मृत्यू

पुणे : पुण्यातील हवेली तालुक्यामध्ये एका स्मशानभूमीजवळ एक ग्रेनेड आढळून आले आहे. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी आणि बॉम्बशोधक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन हे ग्रेनेड निकामी केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील एका स्मशानभूमीजवळ हा प्रकार घडला आहे. या परिसरात असलेल्या आण्णासाहेब मगर विद्यालयाच्या उजव्या बाजुला बॉम्ब सदृश वस्तू आढळून आली. या परिसरात राहणाऱ्या अभिमान गायकवाड यांच्या निदर्शनास ही बाब आल्याने त्यांनी तातडीने पोलीस पाटील अंकुश उंद्रे आणि अशोक आव्हाळे यांना सांगितले. यानंतर पोलीस पाटलांनी लोणीकंद पोलीस स्टेशनला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच मांजरी खुर्द येथे पोलीस पथक आणि बॉम्ब शोधक पथक दाखल झाले. पथकाने पाहणी करून तो ग्रेनेड निकामी केला. पोलिसांनी असेही सांगितले की, खूप वर्षांपूर्वीचा जुना ग्रेनेड तिथे आढळून आलेला आहे. ७ ते ८ वर्षांपूर्वी त्या ठिकाणी भराव टाकण्यात आला होता. पावसामुळे तो आता वर आलेला दिसत आहे. बॉम्बशोधक पथकाने हा ग्रेनेड निकामी केला आहे. हा ग्रेनेड या भरावामध्ये कुठून आणि कसा आला, याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत.

COMMENTS