Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महामानव डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीयांकडून अभिवादन..

पाथर्डी : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून तसेच  विविध संघटनाकडून शहरातील कोरडगाव चौकातील डॉ.बाब

बसच्या सीटखाली ठेवलेला दागिन्यांचा डबा लांबवला
मुळा प्रवरा पर्यावरण संवर्धन समितीचे वाळू उपसाविरोधात आंदोलन
केडगाव एमआयडीसीतील टाकीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली

पाथर्डी : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांकडून तसेच  विविध संघटनाकडून शहरातील कोरडगाव चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालत अभिवादन केले. यावेळी आमदार मोनिका राजळे,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अँड.प्रताप ढाकणे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले,वंचितचे राज्य प्रवक्ते किसन चव्हाण,साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे,भाजपा तालुकाध्यक्ष डॉ मृत्यूंजय गर्जे,माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड,माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके,बंडूशेठ बोरुडे,दिगंबर गाडे, महेंद्र राजगुरू,बाबा राजगुरू,रवी आरोळे,बंडु पठाडे,नितीन गर्जे,रमेश गोरे,बजरंग घोडके,सुरेश भागवत,जगदीश गाडे,सिंधू साठे उपस्थित होते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नासिर शेख, राहुल ढाकणे, आकाश काळोखे, किशोर डांगे, सागर तरटे,राजेंद्र पालवे, गणेश दिनकर आदींच्या वतीने अभिवादन करण्यात आले. पाथर्डी शहरातील नाईक चौकात डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख भगवान दराडे,शहर प्रमुख भाऊसाहेब धस,नवनाथ चव्हाण,विकास दिनकर,किशोर खेडकर,आकाश म्हस्के,राजेंद्र खेडकर,सुनिल परदेशी,सचिन साठे, रावसाहेब पवळे, मच्छिंद्र कसबे, रवी पवार, दादा माळी, सचिन भारस्कर, शिवाजी खंडागळे, शिवनाथ साप्ते आदी उपस्थित होते. पाथर्डी डॉ बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीच्या वतीने शहरातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली.त्याचप्रमाणे नाईक चौक येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरच्या शहर उत्सव समितीने सायंकाळी मिरवणूक काढली यामध्ये असंख्य तरुणांचा सहभाग पाहायला मिळाला.

COMMENTS