Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतीय संस्कृतीत गोसेवेला मोठे महत्त्व- अनंत विभूषित स्वामी शांतिगिरीजी महाराज यांचे प्रतिपादन

ओझर प्रतिनिधी -  गाय शतकानुशतके भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे.गाय आणि माय सारखीच म्हणून भविकांनी गायीची आई प्रमाणे सेवा करावी.रोज

भाजपच्या अध्यक्षपदासाठी फडणवीस शर्यतीत !
भिंगारच्या जुगार अड्ड्यावर छापा, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
निवडणुकीत नाक्यावर सभा घेणारी ही लोकं – राज ठाकरे यांचा आशिष शेलार यांना टोला  

ओझर प्रतिनिधी –  गाय शतकानुशतके भारतीय संस्कृती आणि परंपरेचा अविभाज्य भाग आहे.गाय आणि माय सारखीच म्हणून भविकांनी गायीची आई प्रमाणे सेवा करावी.रोज नैवेद्य द्यावा.गायीचे नित्य नियमाने दर्शन घेऊनच रोजच्या दिनक्रमास प्रारंभ करा असे प्रतिपादन   अनंत विभूषित श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी केले.

      निष्काम कर्मयोगी जगदगुरू जनार्दन स्वामी महाराज धर्मपीठाचे पिठाधिश्वर अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत ओझर येथील देवभूमी जनशांती धाम  येथे गणेश जयंती पर्वकालावर आयोजित सत्संग प्रसंगी पहाटे ब्रम्हमुहूर्तावर  नित्य नियम विधी,ध्यान,प्राणायाम,महाआरती,श्री सार्थ एकनाथी भागवत मार्गदर्शन,श्री शांतीगणेश महाभिषेक पूजन,आश्रमात स्थापन करण्यात आलेल्या श्री अष्टविनायकांचे दर्शन तसेच गोशाळेत श्रमदान संपन्न झाले. प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज बोलत होते. ते पुढे म्हणाले की, गणेश जयंतीच्या या मुहूर्तावर भविकांनी गोसेवेचा प्रारंभ करावा.एक भाविक एक गोमाता या प्रमाणे प्रत्येकाने एका तरी गोमतेची मनोभावे सेवा करावी. भारतीय संस्कृतीत गायीला स्वकीय मानले जाते.या संस्कृतीत वाढलेल्या मानवाला रोज जेवणापूर्वी गोशाळेत बांधलेल्या गायीची आठवण येणे गरजेचे आहे.तिला चारा देऊनच जेवायला बसावे.आपले पूर्वज देखील प्रेमभावनेने गायीची सेवा करत असायचे एवढेच नाही तर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनी देखील गोमातेवर प्रेम करून स्वतःला गोपालक म्हणून घेण्यात धन्यता मानली.आपणही पुन्हा एकदा आजच्या गणेश जयंतीच्या पर्वकालावर गोसेवेचा प्रारंभ करू असेही यावेळी अनंत विभूषित महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करतांना सांगितले.यावेळी परमपूज्य बाबाजींसह आश्रमिय संत, निवासी सेवेकरी आणि उपस्थित भविकांनी  गोशाळेत स्वच्छता करून गोमातेची सेवा केली.

COMMENTS