Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामपंचायत अधिकारी प्रबोधन दिंडीतून प्रशासन व जनतेतील सुसंवाद व्यापक होईल : शैलेश मोरे

अहिल्यानगर: ग्रामीण भागासाठी शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या योजनांची प्रत्यक्ष गावांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामात ग्रामपंचायत अधिका

ग्रंथ वाचनामुळे बौद्धिक समृद्धी वाढते
केबल जळाल्याने. वीजपुरवठा खंडित. संबंधिताच्या दुर्लक्षाने शेतकर्‍यांची पिके करपली
कारखान्‍याचा नवा विस्‍तारीत प्रकल्‍प सहकार चळवळीला नवी दिशा देणारा : पालकमंत्री ना.राधाकृष्‍ण विखे
Displaying DSC_1590.JPG

अहिल्यानगर: ग्रामीण भागासाठी शासनामार्फत राबविण्यात येणार्‍या योजनांची प्रत्यक्ष गावांमध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामात ग्रामपंचायत अधिकारी महत्त्वपूर्ण योगदान देत असतात. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत असताना नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांनी सालाबादा प्रमाणे याही वर्षी यंदा आषाढी वारीनिमित्त अहिल्यानगर ते पंढरपूर अशी प्रबोधन दिंडी काढली आहे. या दिंडीतून ते शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचवतानाच त्याला अध्यात्माचे अनुष्ठानही देणार आहे. या मार्गात वृक्षारोपण करण्याबरोबरच सामाजिक संदेशही देण्यात येणार आहेत. यातून प्रशासन व सर्वसामान्य जनता यांच्यातील सुसंवाद आणखी व्यापक होण्यास मदत होईल, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा वित्त अधिकारी शैलेश मोरे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे  जिल्हाध्यक्ष युवराज पाटील  यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायत अधिकारी यांची अहिल्यानगर ते पंढरपूर अशी पायी प्रबोधन दिंडी शुक्रवारी अहिल्यानगर शहरातून मार्गस्थ झाली. या दिंडीच्या शुभारंभप्रसंगी मुख्य लेखा व वित्त  अधिकारी शैलेश मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाबा देसले, जिल्हा आरोग्य अधिकारी बापुसाहेब नागरगोजे, कार्यकारी अभियंता सागर चौधरी, सहायक गटविकास अधिकारी भगवान बच्छाव ग्रामपंचायत अधिकारी युनियनचे जिल्हा अध्यक्ष युवराज पाटील , पतसंस्थेचे चेअरमन सतीश मोटे , विस्तार अधिकारी रवींद्र माळी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना उपमुख्य  कार्यकारी बाबा देसले म्हणाले की, अध्यात्म, विकास व पर्यावरणाची सांगड घालणारा हा पथदर्शी उपक्रम ग्रामसेवकांनी सुरू केला आहे. शाश्वत विकास साधताना पर्यावरणाचा विचार करणे व संवर्धन करणे ही काळाची गरज आहे. त्यादृष्टीने ग्रामपंचायत अधिकारी दिंडीतून व्यापक प्रबोधन करण्यात येणार आहे. अशा चांगल्या विचारांमुळेच एका चांगल्या समाजाची निर्मिती होण्यास मदत होईल, असा विश्वास वाटतो.
प्रबोधन दिंडीबाबत बोलताना युवराज पाटील म्हणाले की, ग्रामपंचायत अधिकारी यांना आपले काम करताना अनेक वेळा ताणतणावांचा सामना करावा लागतो. महाराष्ट्राचे वैभव असलेल्या आषाढी वारीच्या परंपरेत प्रत्येकाला तणावमुक्त करण्याची ताकद आहे. यासाठी ग्रामपंचायत अधिकारी ही दिंडी आयेाजित करतात. यावेळी समाज प्रबोधनही करण्यात येणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी किर्तन, दुपारच्या विश्रांतीच्या ठिकाणी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना शासनाच्या कल्याणकारी योजनांची माहिती देणे, सेवा हमी कायदा, बेटी बचाओ – बेटी पढाओ अभियान, स्वच्छता अभियान, नरेगा योजना, शौचालय वापर, निर्मल ग्राम, अंधश्रध्दा निर्मूलन, व्याख्याने, भारूड, लघुपटाच्या माध्यमातून गावोगावी प्रबोधन केले जाणार आहे.
 पंढरपूरला पोहचल्यावर महाराष्ट्र सुजलाम्‌ सुफलाम करण्याचे साकडे पांडुरंगाच्या चरणी घालण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दि.२९ जुलैपर्यंत ग्रामपंचायत अधिकारी प्रबोधन दिंडी सोहळा चालणार असून पंढरपूरजवळ राज्यांतील ग्रामपंचायत अधिकारी या दिंडीत सहभागी होणार आहेत. पांढरी शुभ्र वेशभूषा, डोक्यावर टोपी, टाळमृदुंगाचा गजर आणि मुखी हरिनाम अशा प्रसन्नचित्त वातावरणात सर्व ग्रामपंचायत अधिकारी अतिशय शिस्तबध्दरित्या दिंडीत सहभागी झाले आहेत.

या दिंडी सोेहळ्यात अशोक नरसाळे, सुभाष गर्जे, रवींद्र ताजणे, दिलीप नागरगोजे, श्याम भोसले, संपत गोल्हार, विलास काकडे,माणिकराव घाडगे, सतीश सांगळे, संदीप लगड, संपत दातीर, सुरेश मंडलिक, रामदास गोरे, सुनील वाघ, राणी फाटके, रोहिदास आघाव, सुभाष शिंदे, तान्हाजी पानसरे, ऑल्विन शेक्सपियर, देविदास राऊत, गजानन होले, महारुद्र बडे, रामदास सांगळे, रफिक तांबोळी, वैभव वाघ , सचिन पवार, विजय ठोंबरे, शहाजी नरसाळे, शिवाजी निकम, गोवर्धन रांधवने, कृष्णा बडे, शिवाजी वाघ, सारिका वाळुंज, मीना जाधव , प्रदीप कल्याणकर, नफिस पठाण यांच्यासह सुमारे २०० ग्रामपंचायत अधिकारी सहभागी झाले आहेत.

COMMENTS