Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव तालुक्यातील पदवीधर मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

बिपीनदादा कोल्हे, विवेक कोल्हे यांनी रवंदे येथे केले मतदान

कोपरगाव प्रतिनिधी ः महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, सह

खंडणी मागणार्‍याविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करा ; व्यावसायिकांची मागणी
महिलेची छेड काढणार्‍यास सक्तमजुरी व दंडाची शिक्षा
अशोक कामगार पतसंस्थेच्या संचालकपदी नंदा ढूस

कोपरगाव प्रतिनिधी ः महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक, युवा नेते विवेक कोल्हे आणि त्यांच्या पत्नी रेणुका कोल्हे यांनी आज (30 जानेवारी) कोपरगाव तालुक्यातील रवंदे येथील जि. प. शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी कोपरगाव तालुक्यातून जास्तीतजास्त मतदान होण्याच्या दृष्टीने बिपीनदादा कोल्हे व विवेक कोल्हे यांनी प्रयत्न केले.
विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (30 जानेवारी) सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रवंदे (ता. कोपरगाव) येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे आणि त्यांच्या पत्नी सौ. रेणुका  कोल्हे यांनी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास याच मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. युवा नेते विवेक कोल्हे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर कोपरगाव शहरातील माधवराव आढाव माध्यमिक विद्यालयातील मतदान केंद्रासह इतर विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदानाचा आढावा घेतला. आपल्या देशात लोकशाही शासन प्रणाली लागू असून, देशाच्या प्रगल्भ लोकशाहीत मतदानाला खूप महत्त्व आहे. मतदान प्रक्रियेतूनच लोकशाही बळकट होत असते. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केले. यावेळी माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, अनिल सोनवणे, अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे अध्यक्ष पराग संधान, भाजपचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्तात्रय काले, विजयराव आढाव, माधवराव देशमुख, संग्राम देशमुख, महावीर दगडे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, माजी नगरसेवक जनार्दन कदम, अतुलशेठ काले, अशोकराव लकारे, दीपक जपे, वैभव आढाव, रोहित वाघ, प्रसाद आढाव, तुषार पोटे, अक्षय घुले, सलीमभाई अत्तार, विकी जोशी, विक्रांत सोनवणे, चंद्रकांत वाघमारे, संदीप ढोमसे, रुपेश सिनगर, पंकज आढाव, समीर सुपेकर, नितीन बोथ्रा, रोहित कनगरे, विजय चव्हाणके, ऋषिकेश सांगळे आदींसह भाजप, भाजयुमोसह विविध संस्थांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

COMMENTS