अहमदनगर : जिल्हयातील सर्व गौण खनिज वाहतूकदार यांच्या वाहनांचे भौगौलिक सूचना प्रणाली( GPS) द्वारे रिअल टाईम मॉनिटरींग करता यावे. यासाठी ३१ मे, २०२२ पर
अहमदनगर : जिल्हयातील सर्व गौण खनिज वाहतूकदार यांच्या वाहनांचे भौगौलिक सूचना प्रणाली( GPS) द्वारे रिअल टाईम मॉनिटरींग करता यावे. यासाठी ३१ मे, २०२२ पर्यंत वाहनांनी जीपीएस डिव्हाईस बसवून त्याचे महाखनिज या संगणकीय प्रणालीबरोबर इंटीग्रेशन करून घेण्यात यावे.असे आवाहन अहमदनगर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्राद्वारे केले आहे.
राज्यात अवैध उत्खनन व वाहतुकीच्या घटनांना प्रतिबंध व्हावा यासाठी सह सचिव महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्या निर्देशानुसार गौण खनिजाची वाहतूक करणा-या वाहनांसाठी जीपीएस डिव्हाईस बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. इंटिग्रेशन करुन घेण्याची जबाबदारी संबंधीत कंपनी व सिस्टीम इंटिग्रेटर तसेच वाहनधारकाची राहील. ०१ जून, २०२२ नंतर गौण खनिजाची वाहतूक करणा-या वाहनांवर जीपीएस डिव्हाईस बसविलेले नसल्याचे निदर्शनास आले तर, सदरचे उत्खनन व वाहतूक अवैध समजून त्याविरुध्द महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८ (७) व ४८(८) आणि महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास) तसेच महाराष्ट्र जमीन विनियमन, नियम २०१३ अन्वये शासनाने दंडाबाबत वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार, मोटार वाहन कायदा व तदनुषंगीक नियमांतील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल. असे ही उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
COMMENTS