Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासन आपल्या दारी अभियानाचा सातारा पॅटर्न राबवा : पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा / प्रतिनिधी : शासन आपल्या दारी हे अभियान निरंतर चालणारे आहे. एक दिवस योजनांचा लाभ दिला आणि संपले असे नाही. तर पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्

विकास कामांना निधी मंजूर करण्याचा माझा प्रयत्न : ना. शंभूराज देसाई
बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटण्याचा अधिकार फक्त आम्हालाच
जिल्हा वार्षिक योजनेचा निधी मार्च अखेरपर्यंत शंभर टक्के खर्च करा : ना. शंभूराज देसाई

सातारा / प्रतिनिधी : शासन आपल्या दारी हे अभियान निरंतर चालणारे आहे. एक दिवस योजनांचा लाभ दिला आणि संपले असे नाही. तर पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्याचे काम या पुढेही सतत सुरू ठेवायचे आहे. त्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे शासन आपल्या दारी अभियानाची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्‍वर खिलारी, पोलीस अधिक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत आवटे, पाटणचे प्रांताधिकारी सुनिल गाढे यांच्यासह सर्व विभागांचे विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
ग्रामपातळीवर प्रत्यक्ष भेट देऊन जनतेशी संवाद साधण्याच्या सूचना करून पालकमंत्री देसाई म्हणाले, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्य सेविका असे ग्रामपातळीवर काम करणारे आपले कर्मचारी आहेत. त्यांनी 15 दिवसातून एकदा गावातील कुटुंबांशी संवाद साधून त्यांना कोणत्या योजनेचा लाभ देणे शक्य आहे याची तपासणी करावी. त्यासाठी कुटुंबाची संपूर्ण माहिती जमा करावी. त्यामध्ये कुटुंबातील सदस्यांनी कोणत्या-कोणत्या योजनांचा लाभ घेतला. कोणत्या योजनेचा लाभ देणे शक्य आहे हे तपासावे. ज्या योजनेचा लाभ देणे शक्य आहे त्याचा अर्ज जागेवर भरून घ्यावा. तालुका स्तरीय अधिकारी जसे तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांनी महिन्यातून किमान एकदा गावात जाऊन संवाद साधावा. कोणत्या योजनांचा लाभ गावकर्‍यांना देता येतो. याविषयी पहाणी करावी. तसेच ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांना योजनांची माहिती देऊन पात्र लाभार्थ्यांची निवड करावी. जिल्हास्तरीय अधिकारी यांनी महिना किंवा दोन महिन्यातून एकदा गावास भेटी द्याव्यात. सर्वांनी जबाबदारीने कर्तव्य भावनेतून जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी काम करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
बैठकीच्या सुरुवातीस पाटणचे प्रांताधिकारी गाढे यांनी पाटण येथील शासन आपल्या दारी योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाच्या नियोजनाची माहिती दिली. तसेच कशा प्रकारे लाभार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांना लाभ देण्यात आला याची सविस्तर माहिती सादर केली.

COMMENTS