Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यास सरकारला वेळ नाही : छत्रपती संभाजीराजे यांची सडकून टीका

परभणी : तिसर्‍या आघाडीच्या दिशेने चाचपणी सुरू असतानांच या आघाडीच्या नेत्यांनी सोमवारी संयुक्तपणे शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी छत्र

अखेर बच्चू कडू यांनी सोडला मंत्रिपदावरचा दावा
तरुणांनी राजकारणात येण्याची हिच खरी वेळ – विनोदसिंग परदेशी
दिव्यांगांच्या वेदना दूर करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा
Chhatrapati Sambhaji Raje, Bachu Kadu, Raju Shetty will jointly inspect the  damage due to heavy rains in Nanded and Parbhani districts

परभणी : तिसर्‍या आघाडीच्या दिशेने चाचपणी सुरू असतानांच या आघाडीच्या नेत्यांनी सोमवारी संयुक्तपणे शेतकर्‍यांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी छत्रपती संभाजीराजे म्हणाले की, कृषीमंत्र्यांनी इथे येऊन बघावे. मी शेतात जाऊन पाहणी केली. मी गाडीतून पाहणी केलेली नाही. बाकी आमदार, खासदारांना इथे यायला वेळ नाही का? कृषिमंत्र्यांनी तर इथे यायलाच पाहिजे ना. तुम्ही कृषिमंत्री आहात. हा विषय इतका नाजूक बनला आहे की, अशा वेळेस कृषिमंत्र्यांनी इथे येऊन शेतकर्‍यांचे अश्रू पुसायला हवेत. मात्र सरकारला आणि कृषीमंत्र्यांनी शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यासाठी वेळ नसल्याची टीका छत्रपती संभाजीराजे यांनी केली.
यावेळी बोलतांना संभाजीराजे म्हणाजे की, नुकसानीचे पंचनामे व्हायलाच पाहिजे. शेतकर्‍यांची अवस्था पाहून मला वेदना झाल्या. कृषिमंत्री इकडे यायचे सोडून बीडला सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न आहेत. हे बरोबर आहे का? हे महाराष्ट्राला शोभते का? कृषिमंत्र्यांना हे शोभते का? अशी सडकून टीका छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी केली. स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे, प्रहार पक्षाचे प्रमुख बच्चू कडू तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी एकत्र येत तिसरी आघाडी निर्माण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या अनुषंगाने बच्चू कडू, छत्रपती संभाजीराजे आणि राजू शेट्टी यांनी ओला दुष्काळ पाहणी दौरा सुरू केला आहे.

सरकारच्या कानफाडात लगावण्याची वेळ : बच्चू कडू
बच्चू कडे म्हणाले की, जिल्हाधिकारी काय करताय हे मला माहित नाही. ते म्हणताय नुकसान इतके झाले की आम्ही मदत देऊ शकत नाही. 24 तासांच्या आत सानुग्रह अनुदान दिले पाहिजे. प्रशासन करत नसेल तर कारवाई झाली पाहिजे. तलाठ्यांनी तीन तारखेला पंचनामा केले आणि आजपर्यंत दाखल केलेले नाहीत. तर पंचनामे करून अर्थ काय? सरकारच्या कानफाडात लगावण्याची वेळ आली, अशी टीका त्यांनी केली.

COMMENTS