भाजप-शिवसेना सामना पुन्हा जोमात

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप-शिवसेना सामना पुन्हा जोमात

सोमय्याचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार : संजय राऊत

मुंबई/प्रतिनिधी :भाजप नेते किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक झाले असतांनाच, शिवसेना नेते संजय रा

मोदी पंतप्रधान नव्हे प्रचारक; पटोलेंची टीका
युध्द आणि प्रेमासारखं राजकारणातही सारे काही क्षम्य ?
धरणांतील उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करा

मुंबई/प्रतिनिधी :भाजप नेते किरीट सोमय्या यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर सोमय्या पुन्हा एकदा आक्रमक झाले असतांनाच, शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपचा विशेषतः किरीट सोमय्याचा कोटयावधी रुपयांचा टॉयलेट घोटाळा बाहेर काढणार असल्याचा सूचक इशारा दिला आहे.
यावेळी माध्यमांना संबोधित करतांना राऊत म्हणाले की, लवकरच या महाशयांचा मी एक टॉयलेट घोटाळा काढणार आहे. मीरा भाईंदर मनपा आणि महाराष्ट्रात इतरत्र काही कोटींचा घोटाळा झाला. कुठे कुठे पैसे खातायत तर विक्रांत पासून ते टॉयलेट पर्यंत. ही सर्व कागदपत्रे सूपूर्त झाली आहेत. युवा प्रतिष्ठान नावाची जी काही एनजीओ ही लोके चालवत होती त्यांनी शेकडो कोटी रुपयांचा टॉयलेट घोटाळा केला. खोटी बिले, पर्यावरणाचा र्‍हास करुन निर्माण केलेले हे सर्व घोटाळे… हा घोटाळा लवकरच बाहेर येईल. तुम्ही फक्त आता खुलासे करत बसा असेही संजय राऊत म्हणाले.
वैफल्यातून भाजपचे महाविकास आघाडीवर आरोप सुरु आहेत, असं म्हणत यांनी भाजपवर निशाणा साधला. न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टीला छिद्र पडले का? असा सवाल राऊत यांनी किरीट सोमय्यांना उच्च न्यायालयाने दिलेल्या अटकपूर्व जामिनावर बोलताना केला. दरम्यान कोर्टामधून आम्हाला बरेच काही करता येते ते आम्ही करू या भाजप आमदार संजय कुंटे यांच्या वक्तव्याचा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. न्यायव्यवस्थेत दिलासा देण्यासाठी विशेष लोक बसले आहेत अशी टीकादेखील त्यांनी आज केली. दरम्यान, राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील माध्यमांना संबोधित करत, ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याबाबत मुख्यमंत्री गप्प का? चतुर्वेदीचे ठाकरेंसोबत व्यवहार आहेत. 29 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे. या प्रकरणात जितेंद्र आव्हाडांनी उत्तर द्यावं. प्रवीण कलमे यांना कोण वाचवत आहे? 15 दिवस कलमे नाहीत, त्यांना फरार घोषीत करायला हवे. कलमे यांनी सरकारी कार्यालयातून कागदपत्रे चोरली आहेत. त्यांचा एफआयआर दाखल झाल्यानंतर ते गायब झालेले आहेत. तसेच चतुर्वेदीसंदर्भात दिल्लीत पाठपुरावा करणार आहे. कारण, त्यांच्या कंपनीद्वारे मनी लॉन्ड्रिंग झाले आहेत, असा आरोप सोमय्यांनी केले आहेत.

तुर्वेदीचे ठाकरेंसोबत 29 कोटींचे गैरव्यवहार ः सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ठाकरे परिवाराशी संबंधित असणारा हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदी यांना कुठे लपवून ठेवले आहे? त्याला फरार घोषीत करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला सांगावे, नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याबाबत मुख्यमंत्री गप्प का? चतुर्वेदीचे ठाकरेंसोबत व्यवहार आहेत. 29 कोटींचा गैरव्यवहार झाला आहे, असा आरोप करत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी चतुर्वेदींच्या 12 कंपन्यांची यादी पत्रकारांसमोर सादर केली. उद्धव ठाकरे यांच्या मेव्हण्याची श्रीजी होम कंपनी आहे. मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे की, त्यांचा या कंपनीशी काही संबंध नाही. माझ्यावर आरोप करणारे प्रवीण कुलमे कुठे आहेत? ते देशातून बाहेर गेले का? त्यांना जितेंद्र आव्हाडांनी मदत केली का? यांच्या प्रश्‍नांची उत्तर मिळणार का? ठाकरे कुटुंबांचे नंदकिशोर चतुर्वेदीशी व्यवसायिक संबंध आहेत. मुख्यमंत्र्यांच्या मेहुणे पाटणकर यांच्यासोबत व्यवहार झालेले आहेत, असा आरोपही सोमय्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेले आहेत.

COMMENTS