Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवगांव येथे नवरात्र महोत्सवा निमीत्त रेणुकामाता मंदिर परिसरात रविवार पासुन आराधी गितांचा भव्य कार्यक्रम

भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा - रमाकांत बापु मुंडे

केज प्रतिनिधी - हिंदु धर्मातील प्रमुख सणां पैकी नवरात्र महोत्सव हा एक मोठा सण मानला जातो.तिथी पंचांगानुसार आश्‍विन प्रतिपदे पासुन या वर्षी 15 ऑक्

इस्कॉन ब्रीजवर भीषण अपघात, ९ जणांचा मृत्यू अनेक जखमी
राज्यातील 40 तालुक्यात होणार दुष्काळ जाहीर
चहा चांगला नसल्याच्या वादातून कँटिनमधल्या मुलाची हत्या | LokNews24

केज प्रतिनिधी – हिंदु धर्मातील प्रमुख सणां पैकी नवरात्र महोत्सव हा एक मोठा सण मानला जातो.तिथी पंचांगानुसार आश्‍विन प्रतिपदे पासुन या वर्षी 15 ऑक्टोंबर रविवार पासून शारदीय नवरात्र महोत्सव हा देवगांव येथिलरेणुकामाता देवी मंदिर परिसरात प्रत्येक दिवशी नामवंत आराधी मंडळींचा गित गाण्याचा जंगी कार्यक्रम होणार असुन 22 ऑक्टोबर सोमवार रोजी ह.भ.प.केशव महाराज शास्त्री यांच्या किर्तनाने व महाप्रसादाने या नवरात्र महोत्सव कार्यक्रमाची सांगता होणार असल्याची माहीती रेणुका माता देवस्थानचे अध्यक्ष रमाकांत बापू मुंडे यांनी माहीती दिली आहे.
केज तालुक्यातील देवगांव येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शारदीय नवरात्र महोत्सव हा दि.15 ऑक्टोंबर रविवार पासुन सुरु होत असुन या निमीत्त दररोज सकाळी आणी संध्याकाळी रेणुका देवीची आरती देवी भक्त करणार असुन दर दिवशी संध्याकाळी आठ वाजता भोजन फराळ झाल्यानंतर लगेच मंदिर परिसरात दररोज रात्री वेगवेगळे आराधी मंडळी येणार असुन रविवारी रात्री वच्छलाबाई आराधी मंडळ कुंडी,सोमवारी आराधी मंडळ जातेगांव, मंगळवारी लहु ठोंबरे आराधी मंडळ,बुधवारी दादा वांगे आराधी मंडळ हिवरा पहाडी, गुरुवारी पांडु ठोंबरे,ज्योतिराम मुंडे आराधी मंडळ दहिफळ (वड), देवगांव,शुक्रवारी लता सुर्यवंशी आराधी मंडळ सोलापूर,शनिवारी विजय आराधी मंडळ माळेगांव,रविवारी सतिश काटे आराधी मंडळ पाटोदा हे नामाकिंत असलेले आराधी मंडळी रेणुका देविच्या जीवनावर गित गायनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत. सोमवार दि.22 ऑक्टोबर सोमवार रोजी सकाळी आकरा वाजता रेणूका माता मंदिर परिसरात ह.भ.प.केशव महाराज शास्त्री यांच्या किर्तना नंतर लगेच महाप्रसादा  च्या पंगतीने या कार्यक्रमाची सांगता होणार असल्याची माहीती रेणुका माता देवस्थानचे अध्यक्ष रमाकांत बापू मुंडे यांनी माहीती दिली आहे. तर हा नवरात्र महोत्सवात रेणुका पुराण वाचक व सुचक म्हणुन सदाशिव मुंडे,अनुरुध्द मुरकुटे महाराज शिवदास भालेकर,वैजनाथ मुंडे हे करणार आहेत.हा नवरात्र महोत्सव यशस्वी करण्या साठी बापुसाहेब मुंडे, बाळासाहेब मुंडे,भिकु दराडे आणि तरुण युवक  हे सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी करणार आहेत.तरी सर्वभाविकांनी  या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन रेणुका देवी मंदिरसमितीचे अध्यक्ष रमाकांत बापु मुंडे  यांनी केले आहे.

COMMENTS