Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पन्नास लोकांचे सरकार अधिकार्‍यांच्या बदल्यात दंग : अजित पवार

म्हसवड / वार्ताहर : पन्नास लोकांचे सरकार राज्यातील विकासकामाचा आराखडा बनवायचे सोडून अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात जास्त दंग झाले आहे. माणमध्येही

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने भरवलेल्या प्रदर्शनाला महिलांनी भेट द्यावी : डॉ. नीलम गोर्‍हे यांचे आवाहन
विशाखा साळुंखे हिला राष्ट्रीय क्रॉसकंट्री स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक
कोयना भूकंपग्रस्तांच्या चौथ्या पिढीतील वारसांना भूकंपग्रस्तांचे दाखले वाटप

म्हसवड / वार्ताहर : पन्नास लोकांचे सरकार राज्यातील विकासकामाचा आराखडा बनवायचे सोडून अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात जास्त दंग झाले आहे. माणमध्येही तात्यानंतर गलिच्छ राजकारण सुरू झाले. माणमधील काहीजण अगोदर अपक्ष, नंतर काँग्रेस, मग भाजप असे करत आहेत. मात्र, राजकारणात असे चालत नाहीत, असा टोला विधान सभेचे विरोधी पक्षनेते आ. अजित पवार यांनी आ. जयकुमार गोरे यांना लगावला. मार्डी, ता. माण येथील माजी आमदार स्व. सदाशिवराव पोळ यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर, खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. मकरंद पाटील, आ. शशिकांत शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील, प्रभाकर देशमुख, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनिल माने, मनोज पोळ, श्रीराम पाटील, सुनील पोळ, युवराज सूर्यवंशी, दिलीप तुपे, बाळासाहेब सावंत उपस्थित होते.
आ. अजित म्हणाले, मंत्रालयात गेल्यानंतर मला कर्मचारी सांगतात की दादा पन्नास लोकांचे सरकार फक्त आमच्या बदल्या कारण्यात व्यस्त झाले आहे. मार्जीतले अधिकारी आपापल्या भागात आणण्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे आम्हाला नाहक त्रास होत आहे. माणचे राजकारण हे अतिशय खालच्या पध्दतीचे सुरु आहे. तात्यांच्या काळात असे कधीच झाले नाही. काहीजण अपक्ष निवडून येतात. पुन्हा काँग्रेसमध्ये जातात तिथे निवडून आल्यानंतर पुन्हा भाजपमध्ये जातात. आता पुन्हा कुठे जाणार माहिती नाही, असे चालत नाही. तात्यांनी कायम राष्ट्रवादीसोबत राहून तालुक्याचा विकास करताना सर्वात जास्त पाझर तलाव माणमध्ये बांधले. विकासासाठी ते नेहमी पवारसाहेबांशी भांडायचे. जिल्हा परिषद, पंचायत समिती मिळवण्यासाठी आपण सर्वांनी एकजुटीने राहिले पाहिजे. येत्या लोकसभेला माढा मतदार संघातून पवारसाहेबांच्या विचाराचा खासदार निवडून द्या, असे आवाहन त्यांनी केले. तुमचा उस चांगल्या कारखान्याला घाला, ज्याचा काटा चांगला असेल, बिल वेळेवर मिळेल अशाच ठिकाणी उस घाला, नाहीतर पुन्हा माझ्याकडे तक्रार घेऊन येऊ नका. अधिकार्‍यांनो कोणाच्या दबावाला बळी पडून काम करून आमच्या कार्यकर्त्यांना त्रास दिला तर गाठ माझ्याशी आहे. कार्यकर्ता चुकला तर जरूर कारवाई पण नाहक त्रास देऊ नका, असा दमही त्यांनी अधिकार्‍यांना भरला. ज्यांना गद्दारी करायची त्यांनी खुशाल उघड जावा. माझ्यापर्यंत तक्रारी येते, त्यामधील काहीजण आजही खाली बसलेत व काहीजण स्टेजवरही बसल्याचे सांगून निष्ठावंत चारच राहिले तरी चालतील मात्र गद्दारांची फौज घेऊन राजकारण करता येत नसल्याचे आ. पवार यांनी बोलताना स्पष्ट केले.

COMMENTS