कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या करंजी गावाला जोडल्या जाणारे अनेक रस्ते हे मोठ्या प्रमाण
कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाचे असलेल्या करंजी गावाला जोडल्या जाणारे अनेक रस्ते हे मोठ्या प्रमाणात खराब झाले असून या रस्त्यांच्या दुरुस्ती कामाकरिता निधीची उपलब्धता व्हावी याकरिता राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना करंजी गावचे सरपंच व उपसरपंच यांच्या वतीने उपसरपंच शिवाजी जाधव यांनी थेट मंत्रालय गाठत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना निवेदन देत मागणी केली आहे.
सदर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की करंजी गावातील करंजी आंचलगाव ओगदी शिवरस्ता 1 किलोमीटर, करंजी ते आंचलगाव रस्ता 2 किलोमीटर, संपत भिंगारे वस्ती ते वसंत उसरे वस्ती रस्ता 2 किलोमीटर, करंजी शिव रस्ता ते अनिल चरमळ वस्ती रस्ता 1.5 किलोमीटर, सखाराम ढवळे वस्ती ते भवर वस्ती जुना कॅनल पर्यंत रस्ता 1 किलोमीटर, योगेश काळे घर ते संजय शिंदे वस्ती रस्ता 1 किलोमीटर, मधुकर डोंगरे मळा ते कोल्हे वस्ती रस्ता 2 किलोमीटर, अशोक गुंजाळ मळा लगत ते संजय काजळे वस्ती रस्ता 1 किलोमीटर, सलीम शेख घर ते बशीर शेख घर रस्ता 1 किलोमीटर, करंजी ते पढेगाव शिव रस्ता 1 किलोमीटर तसेच करंजी ते शिंगणापूर जुना रस्ता 2 किलोमीटर अशा एकूण करंजी गावातील 15.5 किलोमीटरच्या 10 रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली असून सदर निवेदनावर सरपंच रवींद्र आगवण व उपसरपंच शिवाजी जाधव यांच्या सह्या आहेत. सदर निवेदन देते प्रसंगी उपसरपंच शिवाजी जाधव, प्रहार संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय शिंदे, शिवसेनेचे संजय उगले, लक्ष्मण भिंगारे, रोहित कदम, बापू कदम आदी उपस्थित होते.
COMMENTS