Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘शासन आपल्या दारी’ अन् जनता ‘एसटी विना त्रासलेली’

जामखेड आगाराचा नियोजनशून्य कारभार पुन्हा चव्हाट्यावर

जामखेड प्रतिनिधी ः राज्यात शासन आपल्या दारी या मोहिमेचा व्यापक प्रचार आणि प्रसार सरकारकडून सुरू आहे. नुकताच गुरूवारी 17 ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ

खडकावर उमटलेल्या पानांच्या ठशांवरून होणार… हवामानाचा अभ्यास
अमरधाममधील कामगारांना मनपाच्या सेवेत नोकरी द्या
आमदार पवारांच्या प्रयत्नातून काळे-मदने वस्तीवर विजेची सोय

जामखेड प्रतिनिधी ः राज्यात शासन आपल्या दारी या मोहिमेचा व्यापक प्रचार आणि प्रसार सरकारकडून सुरू आहे. नुकताच गुरूवारी 17 ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते शिर्डीमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्यात आला. मात्र जामखेडमध्ये बस आगाराचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आल्यामुळे शासन आपल्या दारी अन् जनता एसटी विना त्रासलेली असेच म्हणायची वेळ आली आहे.
शिर्डी येथील कार्यक्रमाला जाण्यासाठी जामखेड-कर्जत तालुक्यातील कार्यकर्त्यांना जामखेड बस आगाराकडुन 35 बस देण्यात आल्या आहेत. कार्यक्रमासाठी 17 तारखेला सकाळी 7 वाजता बस तालुक्यातील विविध गावांतून निघणार असे असतांना जामखेड आगाराने एक दिवस आगोदरच बस थांबवून ठेवल्या होत्या. त्यामुळे 16 ऑगस्ट रोजी जामखेड येथुन रोजच्या अनेक मार्गावर बस सोडल्याच नाहीत. प्रवाशांना तासनतास बसची वाट पाहत थांबावे लागले. शेवटी बाहेरच्या बस आल्याने काहीना पुढे प्रवास करता आला तर अनेकजण थांबुन थांबून मिळेल त्या वाहनाने परत घरी गेले. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केलेल्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा उद्देश सरकारी सेवा आणि लाभ घेताना नागरिकांना येणार्‍या अडचणी दूर करणे हा आहे. बर्याचदा, व्यक्तींना विविध नोकरशाही प्रक्रियांमधून नेव्हिगेट करावे लागते आणि त्यांना हक्क असलेल्या योजनांमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक कार्यालयांना भेट द्यावी लागते. ही नवीन मोहीम सरकारला थेट लोकांच्या दारात आणून प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न करते.मात्र जामखेड आगाराला हा उद्देश कळाला नाही. 45 किमी वर बस मुक्काम देण्यासाठी दिवसभर बसेस उभ्याच ठेवल्या. बसेस देण्याच्या सरकारच्या आदेशाचे पालन करतांना प्रवाशांचा विचार केला नाही. आडमुठया नियोजनामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय केल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

COMMENTS