Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अबब..! रवींद्र नाट्य मंदिराच्या फक्त नुतनीकरणावर 250 कोटींचा खर्च; इतका मोठा निधी कुठे आणि कसा खर्च केला, याचे उत्तर उपअभियंता अजय बापट देणार का?बापटांचा डीपीडीसीच्या 7 कोटींचे कामे विकण्याचा घाट का ?

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील दादर उपविभागात कार्यरत असलेले उपअभियंता अजय बापट यांनी रवींद्र नाट्य मंदिराच्या केवळ नुतनीकरणावर 250 कोटींचा

सौ.के.एस.के. महाविद्यालयाची डिपेक्स 2026 विज्ञान प्रदर्शनास शैक्षणिक भेट
योगेश्वरी पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांनी बनवले एलईडी स्क्रीन
महिला कर्मचार्‍यांसाठी ‘कम अर्ली-गो अर्ली’ सवलत
The current image has no alternative text. The file name is: fa2b.jpg

मुंबई : सार्वजनिक बांधकाम विभागातील दादर उपविभागात कार्यरत असलेले उपअभियंता अजय बापट यांनी रवींद्र नाट्य मंदिराच्या केवळ नुतनीकरणावर 250 कोटींचा खर्च केल्याने यात मोठ्या रकमेचा गैरव्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. कारण 250 कोटींच्या रकमेमध्ये तीन नवे नाट्य मंदीर उभारता आले असते, असे असतांना इतका मोठा निधी कसा  मंजूर झाला, आणि उप अभियंता अजय बापट यांनी तो कुठे आणि कसा खर्च केला, याचे उत्तर अजय बापट यांनी देण्याची मागणी होत आहे.
उपअभियंता अजय बापट यांनी या उपविभागात नियमबाह्य कामांचा धडाका लावला असून, फक्त रवींद्र नाट्य मंदिराच्या नुतनीकरणावर जर इतका मोठा खर्च दाखवण्यात आला असेल, तर त्यातून किती टक्केवारीचा खेळ झाला असेल, हे सांगायलाच नको. नाट्य मंदिराच्या नूतनीकरणाच्या कामांसाठी सुमारे 150 कोटी रुपयांचा खर्च दाखवण्यात आला, तर देखभाल व दुरुस्तीच्या कामांमध्ये सुमारे 100 कोटी रुपयांचा खर्च नोंदवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्ष कामांच्या प्रमाणाशी हा खर्च जुळत नसल्याचे प्रत्यक्षात कामे न करताच या निधींचा अपहार केल्याचे वास्तव दिसून येत आहे. या प्रकरणात उपअभियंता बापट यांच्यासह शाखा अभियंता आदित्य सूर्यवंशी, कनिष्ठ अभियंता निलीमा काकुलते, प्रवीण फाटेकर आणि रोहित कुडतरकर यांच्या भूमिकेबाबतही चर्चा सुरू आहे. विविध कामांच्या नावाखाली शासकीय निधींचा अपहार सुरू असल्याचे दिसून येत आहे. उपअभियंता बापट यांच्या अखत्यारीत नायगाव, माहीम आणि दादर येथील पोलीस वसाहती तसेच रेल्वे पोलीस वसाहतींच्या देखभाल-दुरुस्तीची कामे येतात. या कामांमध्येही विविध योजनांमधील निधीचा वापर करताना अनियमितता झाल्याचे दिसून येत आहे. दैनिक लोकमंथनचे मुख्य संपादक डॉ. अशोक सोनवणे यांनी राज्य शासनाकडे तक्रार करत संबंधित अधिकार्‍यांच्या कामकाजाची तपासणी करण्याची मागणी केली आहे. तसेच या अधिकार्‍यांच्या मालमत्तेची चौकशी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

अधिवेशनात व्हावी चौकशीची मागणी
सार्वजनिक बांधकाम विभागातील दादर उपविभागात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराची आणि 250 कोटींच्या रवींद्र नाट्य मंदिराच्या नुतनीकरणावर विधानसभेच्या अधिवेशनात प्रश्‍न उपस्थित होऊन याची गंभीर चौकशी होण्याची गरज आहे.

उप अभियंता नंदकुमार पाटलांचाही भ्रष्टाचारात मोठा हातखंडा
एकीकडे उप अभियंता यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण समोर येेत असतांना आपण ही काही कमी नसल्याचे भायखळा उपविभाग-दोनचे उपअभियंता नंदकुमार पाटील सिद्ध करतांना दिसून येत आहे. गेल्या चार वर्षांपासून या उपविभागात ते ठाण मांडून असून, भ्रष्टाचाराचे इमले रचतांना दिसून येत आहे. त्यासंदर्भातील अनेक तक्रारी आमच्याजवळ आल्या असून, त्याचाही लवकरच सविस्तर वृत्तांत आम्ही प्रकाशित करणार आहोत. यासोबतच वरळी उपविभागाचे उपअभियंता अनिल पनाड यांच्या कार्यकाळातील झालेल्या कामांतही मोठ्या प्रमाणावर अपहार झाला असून, त्याचा सविस्तर वृत्तांत लवकरच..

श्रीमती रेश्मा चव्हाण यांचे 200 कोटींचा घोटाळा
विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना बदनाम करण्याचे षड्यंत्र

आमदार निवास येथील उपअभियंता श्रीमती रेश्मा चव्हाण यांच्याकडे विधानभवनाचा अतिरिक्त कार्यभार असतांना त्यांनी कामे न करताच तब्बल 25 कोटींचे देयके अदा केल्याचे दिसून येत आहे. यासोबतच सन 2022-23, 2023-2024, 2024-2025 या कार्यकाळात विधानभवन शाखेमध्ये देखभाल दुरूस्तीच्या नावावर तब्बल 200 कोटींचा खर्च दाखवण्यात आला असला तरी, त्यातील केवळळ 20-25 टक्केच कामे झाली आहेत. त्यामुळे हा संपूर्ण निधींमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून, कोट्यावधी रूपयांचा निधी संगनमताने हडप करण्यात आला आहे. याशिवाय श्रीमती रेश्मा चव्हाण आपल्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा वरदहस्त असल्याचे सांगून नार्वेकरांना बदनाम करत आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन श्रीमती रेश्मा चव्हाण यांची चौकशी होण्याची गरज आहे.

COMMENTS