Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत आजपासून गोदा महोत्सव

विभागीय मिनी सरस महोत्सवाचे आयोजन

नाशिक : जिल्हा जिल्हा ग्रामीण ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत दि. ६ व ७ फेब्रुवारी या कालावधीत डोंगरे वसतिगृह मैदान

महीलांनी उसतोडीला पर्याय शोधावा, प्रशासन मदत करेल-जिल्हाधिकारी
देशाच्या राजकारणात भारतीय जनता  पार्टीमुळे अमुलाग्र परिवर्तन-राजेंद्र मस्के
सरन्यायाधीश ट्रोल होतात तेव्हा……..!

नाशिक : जिल्हा जिल्हा ग्रामीण ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत दि. ६ व ७ फेब्रुवारी या कालावधीत डोंगरे वसतिगृह मैदान येथे गोदा महोत्सव व विभागीय मिनी सरस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, या महोत्सवाचे उद्घाटन आज रोजी सकाळी ११.०० वाजता पालकमंत्री ना.दादाजी भूसे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तु व खाद्यपदार्थ विक्री विभागीय मिनी सरस प्रदर्शनाचे आयोजन शासनामार्फत केले जाते. यंदाच्या वर्षी विभागीय सरस महोत्सव व गोदा महोत्सव हा नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे.

विभागीय मिनी सरस व गोदा महोत्सवात नाशिक विभागातील महिला स्वयंसहाय्यता गटातील महिलांकडून उत्पादित केलेल्या दर्जेदार वस्तूंचे प्रदर्शन व विक्री केली जाणार आहे. त्याचबरोबर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व उमेद अभियान नाशिकच्या वतीने बचत गटांचा ब्रँड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इट वाईजली, तत्व या ब्रँडच्या विविध वस्तूंची विक्री या महोत्सवात केली जाणार आहे.

दि. ६ व ७ फेब्रुवारी रोजी आयोजित गोदा महोत्सव अंतर्गत दररोज सकाळी १० ते रात्री १० पर्यंत महिलांनी उत्पादित केलेल्या विविध आकर्षक अशा वस्तु व चविष्ट खाद्यपदार्थ नाशिककरांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी यावेळी दिली. ग्रामीण भागातील महिला बचत गटांकडून उत्पादित केलेल्या दर्जेदार वस्तु व खाद्यपदार्थ योग्य दरात या महोत्सवात नाशिककरांना उपलब्ध होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवात सहभागी होऊन ग्रामीण भागातील महिला बचत गटांना प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने नागरिकांनी गोदा महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

COMMENTS