ग्लोबल स्लेवरी इंडेक्स २०२३ च्या संशोधन अहवालातून, जगात जवळपास पाच कोटी लोक गुलाम असल्याची, धक्कादायक माहिती समोर आली आहे. अर्थात, सध्याच्या का
ग्लोबल स्लेवरी इंडेक्स २०२३ च्या संशोधन अहवालातून, जगात जवळपास पाच कोटी लोक गुलाम असल्याची, धक्कादायक माहिती समोर आली आहे. अर्थात, सध्याच्या काळात गुलाम हे एका देशातून दुसऱ्या देशात निर्यात केले जात आहेत आणि यामध्ये उत्तर कोरियाचा सर्वात मोठा हिस्सा आहे. उत्तर कोरियातील प्रत्येक दहा व्यक्ती मागे एक व्यक्ती ही गुलाम आहे. या गुलामांना विदेशात खास करून बांधकाम क्षेत्रात मजूर म्हणून पाठवले जाते. यासाठी निवड करण्याचा देखील त्यांचा एक निकष ठरलेला आहे. ग्लोबल स्लेवरी इंडेक्स २०२३ या अहवालात नमूद केलेल्या या गुलामीच्या क्षेत्रामध्ये उत्तर कोरिया हा प्रथम आहे; तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर अनुक्रमे आफ्रिकी देश एरिट्रिया आणि माॅरतानिया या देशांचा समावेश होतो. त्याचबरोबर युएई, कुवेत आणि सौदी अरब यासारख्या अत्यंत संपन्न देशात देखील गुलामगिरी आहे, अशी धक्कादायक माहिती ग्लोबल स्लेवरी इंडेक्स मधून बाहेर आली आहे. परंतु, उत्तर कोरिया आणि एरिट्रिया माॅरतानिया या मध्ये तेथीलच नागरिक हे गुलाम आहेत. तर, युएई, सौदी अरब आणि कतार या देशांमध्ये बाहेर देशातून गेलेले नागरिक तेथे गुलामीचे जीवन जगत आहेत. अर्थात, आधुनिक जगातील ही गुलामगिरी म्हणजे विकसित देशांना किंवा मनुष्यबळ कमी असलेल्या देशांना संरचनात्मक कामे किंवा बांधकाम, रस्ते, पूल, धरणे आदी, कामात जे मानवी श्रम लागतं, त्या श्रमामध्ये या लोकांना गुलाम म्हणून पाठवले जाते. उत्तर कोरियात तर १००० व्यक्तींमागे जवळपास १०५ लोकं बाहेर देशात गुलामीसाठी पाठवतात. यासाठी निवड करताना विवाहित पुरुषांची निवड केली जाते आणि त्यांच्या कुटुंबावरही देखरेख ठेवली जाते. अर्थात, ही देखरेख कुटुंबातील कोणीही सदस्य इतरत्र पळून जाऊ नये, यासाठी केले जाते. मात्र, यात सर्वाधिक धक्कादायक बाब अशी की, या गुलामांना जे वेतन मिळते, त्या वेतनातील ९०% हिस्सा हा उत्तर कोरियाच्या अध्यक्ष किम जोंग यांना पाठवला जातो. उत्तर कोरियाचे सर्वाधिक गुलाम हे रशियामध्ये बांधकाम क्षेत्रात काम करताना दिसून आले आहेत. त्यांची संख्या जवळपास ५० हजार एवढी आहे. सेंटर फॉर नॉर्थ कोरियन ह्यूमन राइट्स या संस्थेने उत्तर कोरिया मध्ये गुलामांची अवस्था अत्यंत बिकट आहे, ही माहिती देत असतानाच उत्तर कोरियातील सर्वाधिक गुलाम हे रशियाला पाठवले गेल्याची माहितीही या ह्युमन राईटच्या आकडेवारीतून बाहेर आली आहे. अर्थात, उत्तर कोरियातील ही गुलामांची निर्यात करण्याची पद्धत साधारणतः किम जोंग यांनी सत्तेची सूत्रे २०१२ ला आपल्या हातात घेतल्यानंतर सुरू केली. उत्तर कोरियातील भीषण दारिद्र्य आणि हुकुमशहाची त्या ठिकाणी असणारी मनमर्जी या सर्व परिस्थितीला कंटाळून काही लोक त्या देशाच्या सीमा ओलांडून युरोप, अमेरिकेसारख्या देशात पोहोचून तिथे छोटी मोठी कामे करून चांगले जीवन जगतात. परंतु, अशा लोकांचा परिवार जेव्हा मागे राहतो तेव्हा त्या परिवाराच्या सदस्यांना उत्तर कोरियातील हुकुमशाह हे इतर देशांमध्ये गुलाम म्हणून पाठवतात. त्यांच्या गुलामीच्या मोबदल्यात त्यांच्याकडून किंवा त्यांच्या वेतनातील ९०% हिस्सा सरकारचा हिस्सा म्हणून घेतात. ज्या परक्या देशात ही गुलाम राबतात तिथे त्यांची कामाचे तास ठरलेले नाहीत. त्यांचे वेतन ठरलेले असले तरी त्यातील ९०% हिसा हा उत्तर कोरियाच्या किंवा ज्या देशातील गुलाम असतात त्या देशांच्या सरकारांना जातो. त्यामुळे गुलाम तिथे हलाखीच्या स्थितीत असतात. अर्थात, दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर संयुक्त राष्ट्र संघ यांनी जी भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर बजावली आहे, त्यांनी देखील गुलामीचे हे वास्तव असल्याचे मान्य केले ले आहे. त्यामुळे आधुनिक जगातील ही परिस्थिती किती भीषण आहे, याचाच ‘ग्लोबल स्लेवरी इंडेक्स’ या अहवालात भीषण आणि धक्कादायक अशी माहिती जगासमोर आल्याने, संपूर्ण जग यामुळे चक्रावून गेले आहे.
COMMENTS