Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुस्लिमांनाही कुणबीतून आरक्षण द्या

मनोज जरांगे यांची नवी मागणी

छ.संभाजीनगर ः राज्यात मराठा आरक्षणाबरोबरच आता ओबीसी बांधव देखील ओबीसी आरक्षण बचावासाठी रस्त्यावर उतरतांना दिसून येत आहे. त्यामुळे ओबीसी विरूद्ध म

…तर, विधानसभेच्या 288 जागा लढवणार : मनोज जरांगे
मनोज जरांगे राज्यभर करणार रास्ता रोको
मनोज जरांगेंच्या आंदोलनामागे शरद पवार

छ.संभाजीनगर ः राज्यात मराठा आरक्षणाबरोबरच आता ओबीसी बांधव देखील ओबीसी आरक्षण बचावासाठी रस्त्यावर उतरतांना दिसून येत आहे. त्यामुळे ओबीसी विरूद्ध मराठा असा संघर्ष राज्यात उभा राहत असतांनाच मनोज जरांगे यांनी कुणबी नोंदी असणार्‍या मुस्लिमांनादेखील कुणबीतून आरक्षण देण्याची नवी मागणी केली आहे.
मनोज जरांगे माध्यमांसोबत बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सरकारी नोंदी निघालेल्या मुस्लिमांना सुद्धा कुणबीतून आरक्षण द्या. सगेसोयर्‍यांची अंमलबजावणी करा, अन्यथा विधानसभेला गुलाल रुसेल असा इशारा जरांगे यांनी दिला आहे. आम्हाला कायद्याचा आधार आहे. आमच्या कुणबी म्हणून नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीमध्येच आरक्षण मिळायला पाहिजे. सगेसोयरेच्या अंलबजावणीची व्याख्या आमच्या म्हणण्याप्रमाणे करा, अन्यथा विधानसभेला गुलाल तुमच्यावर रुसेल असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. पुढे मनोज जरांगे म्हणाले की, ’’तुम्ही गुलालाचा अपमान करू नका. कोणाच्याही दबाबावाला बळी पडू नका. कुणबी म्हणून सरकारी नोंदी या मुस्लिम समाजाच्या देखील निघाल्या आहेत. त्यांच्या नोंदी सरकारी निघाल्या तर मुस्लिमांना सुद्धा ओबीसीमधून आरक्षण दिले पाहिजे. त्यांच्यावर देखील अन्याय झाला नाही पाहिजे. पाशा पटेलांची देखील कुणबी म्हणून नोंद निघाली आहे. मी सर्व पुरावे द्यायला तयार आहे. मुस्लिमांची सरकार दरबारी कुणबी नोंद निघाली असेल तर राज्यातील सर्व मुस्लिमांनाही ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिले पाहिजे, अशी मागणी जरांगे यांनी केली. आरक्षण कसे मिळत नाही, तेच मी बघतो, असे जरांगे म्हणाले.

राजकारणात उतरण्याचा दिला इशारा – मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा स्वीकारला असून, त्यांनी आरक्षण न दिल्यास राजकारणात उतरण्याचा इशारा दिला आहे. राजकारण हा आमचा मार्ग नाही. आम्हाला राजकारणात जायचे नाही. पण आम्हाला जर आरक्षण दिले नाही तर राजकारणात उतरावे लागेल. आचारसंहितेच्या आधी आरक्षण द्या. ज्यांच्या सरकारी नोंदी सापडल्या आहेत. त्यांना आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. आमच्या मागण्या मान्य होणार नसतील तर आम्हाला राजकारणात उतरावे लागले असा इशारा जरांगे यांनी दिला आहे.

COMMENTS