Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सहा महिन्यात मराठा समाजाला आरक्षण द्या

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे साकडे

छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी ः गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाचे आरक्षण प्रलंबित असल्यामुळे मराठा समाजामध्ये कमालीची नाराजी आहे. त्यामुळे आम्ह

आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक
छ. संभाजीनगर मध्ये मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी
विशेष अधिवेशनात आवाज उठवा सकल मराठा समाजाचा आक्रोश  

छत्रपती संभाजीनगर/प्रतिनिधी ः गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाचे आरक्षण प्रलंबित असल्यामुळे मराठा समाजामध्ये कमालीची नाराजी आहे. त्यामुळे आम्ही आता मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असून मराठा समाजाला आगामी 6 महिन्यात टिकाऊ आरक्षण मिळाले पाहिजे अशी मागणी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केली आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते फडणवीस यांनी टिकणारे आरक्षण दिले होते.मात्र महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा आरक्षणाकडे पूर्णतः दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप ही त्यांनी यावेळी केला. सावंत यांनी आरोग्य उपसंचालक कार्यालयात आरोग्यवस्थेचा आढावा घेतला त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. डॉ. सावंत यांच्या उपस्थितीत रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये आरोग्य विभागाची आढावा बैठक होती. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी सवांद साधला.
यावेळी आरोग्य उपसंचालक महानंदा मुंडे जिल्हा शल्य चिकित्सक दयानंद मोतीपवळे सहसंचालक भूषण कुमार रामटेके, यासह विविध अधिकार्‍यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कळकळीने मराठा समाजाला आरक्षण मिळून दिले. मात्र मागच्या सरकारने हे आरक्षण घालवले आहे. महाविकास आघाडी सरकारने हे आरक्षण टिकवण्यासाठी कुठलेही प्रयत्न केलेले नाहीत. सर्वोच्च न्यायालयात तारखा सुरू असताना यांचा वकील देखील हजर राहत नव्हता त्यामुळे आम्ही आता हे आवाहन करतो की सरकारच्या वतीने येथे सहा महिन्यात मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे.त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून प्रयत्न करणार येणार असल्याचे सावंत यांनी सांगितले. यावेळी बोलताना सावंत संभाजी महाराज स्वराज्य रक्षक तर होतेच पण धर्मवीर देखील होते. जो माणूस 39 दिवस ह्याचे हाल केले तरी तो माणूस डगमगला नाही त्यांनी असे सावंत यांनी सांगितले.

COMMENTS