Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शालेय स्वयंपाकी व मदतनीसांना दारिद्रय रेषेचे कार्ड द्या ः महेंद्र विधाते

कोपरगाव प्रतिनिधी ः शालेय पोषण आहार योजना हि केंद्र सरकारची योजना असून या योजनेत जिल्हा परिषद नगरपालिका व खाजगी अनुदानित शाळेमध्ये विद्यार्थ्यांन

कृषी संजीवनी मोहिमे अंतर्गत शेतकऱ्यांना मार्गदर्शन
पंढरपूर पोटनिवडणुकीसाठी ३० अर्ज वैध
वरवंडीत सर्वधर्म गुरूपौर्णिमा उत्साता

कोपरगाव प्रतिनिधी ः शालेय पोषण आहार योजना हि केंद्र सरकारची योजना असून या योजनेत जिल्हा परिषद नगरपालिका व खाजगी अनुदानित शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मध्यांन्ह भोजन योजने मध्ये आहार शिजून दिला जातो. हे काम करण्यासाठी प्रत्येक शाळेत स्वयंपाकी व मदतनीस नेमलेले आहेत. या स्वयंपाकी व मदतनीस यांना महिन्याला दीड हजार रुपये वेतन दिले जाते. त्यांच्या या वेतनानुसार वार्षिक उत्पन्न पंधरा हजार होते .म्हणून शासनाने त्यांना दारिद्र्यरेषेचे कार्ड तात्काळ द्यावी अशी मागणी सम्यक फाउंडेशन संचलित श्रमिक मजदूर संघ स्वयंपाकी व मदतनीस विभाग या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र विधाते यांनी केली आहे.
कोपरगाव येथील समता सभागृहामध्ये संघटनेचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. याप्रसंगी शरद लोहोकरे नाशिक जिल्हा अध्यक्ष, संतोष उशीर येवला तालुकाध्यक्ष, प्रकाश पानपाटील, विद्या अभंग, दिपाली भागवत, संदीप देशमुख कोपरगाव निमंत्रक हे हजर होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्ह्याचे अध्यक्ष सविता विधाते ह्या होत्या. शालेय पोषण आहार योजनेत काम करणारे स्वयंपाकी व मदतनीस यांना 53 रुपये रोज इतक्या मानधनावर काम करावे लागते. हे वेतन दारिद्र्य रेषेखालील आहे. म्हणून शासनाने त्यांना दारिद्र्य रेषेचे कार्ड द्यावी असे महेंद्र विधाते म्हणाले. स्वयंपाकी व मदतनीस या सर्वांच्या समस्या शासन स्तरावर मांडून लवकरात लवकर त्यांचे प्रश्‍न लवकरात लवकर सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नाशिक जिल्हाध्यक्ष शरद लोहकरे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे प्रत्येक स्वयंपाकी व मदतनीस यांना किमान पंधरा हजार रुपये दरमहा वेतन मिळावे आणि नियमानुसार शासकीय सेवेत सामावून घ्यावे यासाठी शासन दरबारी, वेळप्रसंगी रस्त्यावरची लढाई करून ही मागणी पूर्ण करून घेणार असल्याचे कार्यक्रमाचे अध्यक्षा सविता विधाते यांनी सांगितले. या कार्यक्रमास राहता संगमनेर कोपरगाव येवला येथील ठिकाणचे स्वयंपाकी व मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्याचे आयोजन कोपरगाव तालुका मजदूर श्रमिक संघ यांनी केले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश पानपाटील यांनी केले तर संदीप देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या अभंग यांनी केले.

COMMENTS